लेक राहाच्या जन्मानंतर आलिया भटने रणबीर कपूरला दिलं होतं हे काम, अभिनेत्रीनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 10:22 IST2023-08-16T10:21:56+5:302023-08-16T10:22:41+5:30

Alia Bhatt And Ranbir Kapoor : आलिया भटने नोव्हेंबर २०२२ मध्ये मुलगी राहाला जन्म दिला. तेव्हापासून ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याकडेही खूप लक्ष देते.

After the birth of daughter Raha, Alia Bhatt gave the job to Ranbir Kapoor, the actress herself revealed | लेक राहाच्या जन्मानंतर आलिया भटने रणबीर कपूरला दिलं होतं हे काम, अभिनेत्रीनेच केला खुलासा

लेक राहाच्या जन्मानंतर आलिया भटने रणबीर कपूरला दिलं होतं हे काम, अभिनेत्रीनेच केला खुलासा

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाला जन्म दिला. दोघेही त्यांच्या या टप्प्याचा आनंद घेत आहेत आणि नेहमी काम पूर्ण करण्याचा आणि शक्य तितक्या लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आलिया आणि रणबीर अनेक मुलाखतींमध्ये फक्त त्यांची मुलगी राहाविषयीच बोलताना दिसतात. आता आलिया भटने एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिच्या मुलीच्या जन्मानंतर तिने रणबीरला हे काम करण्यास सांगितले होते.

आलिया भटने वोगला दिलेल्या मुलाखतीत मुलगी राहाविषयी खूप काही सांगितले. आलियाने मुलाखतीत तिची स्कीन आणि मेकअप रूटीनबद्दल सांगितले. यावेळी आलिया म्हणाली की, राहाचा जन्म झाला तेव्हा तिने रणबीरला राहाच्या पापण्या मोठ्या आहेत की नाही हे तपासण्यास सांगितले होते. आलिया पुढे म्हणाली की तिचे रणबीरसारखे मोठ्या पापण्या नाहीत पण ती तिची लेक वडिलांवर गेली आहे. राहाच्या पापण्या मोठ्या आहेत. अनन्या पांडेनेही अलीकडेच सांगितले होते की, आलियाची मुलगी खूप सुंदर आणि गोड आहे.

वर्कफ्रंटबद्दल...
आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची रणवीर सिंग सोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात आलिया-रणवीरसोबत शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच आलियाचा हार्ट ऑफ स्टोन हा हॉलिवूड डेब्यू चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Web Title: After the birth of daughter Raha, Alia Bhatt gave the job to Ranbir Kapoor, the actress herself revealed