तैमुरनंतर आता प्रियांका चोप्रा व निक जोनासची बाहुली बाजारात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 15:11 IST2018-12-05T15:10:40+5:302018-12-05T15:11:42+5:30

सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरच्या नावाने बाजारात गोंडस बाहुल्या आल्या होत्या. त्यानंतर आता एका सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात दाखल झाली आहे.

After Taimoor, Priyanka Chopra and Nicky Jonas's dolls enter the market | तैमुरनंतर आता प्रियांका चोप्रा व निक जोनासची बाहुली बाजारात दाखल

तैमुरनंतर आता प्रियांका चोप्रा व निक जोनासची बाहुली बाजारात दाखल


सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरच्या नावाने बाजारात गोंडस बाहुल्या आल्या होत्या. त्यानंतर आता एका सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात दाखल झाली आहे. हे जोडपे कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल ना.
हे जोडपे दीपवीर नसून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आहे. निळ्या सूटमध्ये निक जोनस आणि पिवळ्या बॉर्डरच्या साडीमध्ये प्रियांका चोप्रा अशी ही बाहुली आहे. ही बाहुली मातीची असून जोधपूरच्या एका कलाकाराने तयार केली आहे.



गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांकाला घ्यायला निक अगदी घोडीवरून वाजतगाजत आला.


 उमेद भवनात शाही वरात निघाली़ यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, हे सांगणे नकोच. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोनने कुणी फोटो घेऊ नये यासाठी खास इस्राईलवरून १२ शूटर्स बोलवण्यात आले होते. तथापि आज रिसेप्शनला काही तास असताना प्रियांका व निकच्या लग्नाचे अधिकृत फोटोही जारी करण्यात आले.


 
 

Web Title: After Taimoor, Priyanka Chopra and Nicky Jonas's dolls enter the market