सोनाक्षी सिन्हानंतर ही अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, करोडपती अभिनेत्यासोबत लग्नाच्या चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:55 IST2024-06-27T09:54:42+5:302024-06-27T09:55:47+5:30

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हानंतर तिची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

After Sonakshi Sinha, this actress will be tied up in marriage, sparking the talk of marriage with the multi-millionaire actor | सोनाक्षी सिन्हानंतर ही अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, करोडपती अभिनेत्यासोबत लग्नाच्या चर्चेला उधाण

सोनाक्षी सिन्हानंतर ही अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, करोडपती अभिनेत्यासोबत लग्नाच्या चर्चेला उधाण

सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)च्या बेस्टफ्रेंड्सपैकी एक हुमा कुरेशी(Huma Qureshi)नेही तिच्या लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत हुमा कुरेशी तिचा बॉयफ्रेंड रचित सिंगसोबत पोहोचली होती. या सोहळ्यात अनेक फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. आता बातमी अशी आहे की, सोनाक्षीनंतर हुमा कुरेशीचे लग्न करणार आहे.

हुमा आणि रचितच्या डेटिंगच्या चर्चा वेगाने येत आहेत. सोनाक्षीच्या लग्नाच्या या फोटोंमध्ये रचितसोबत 'डबल एक्सएल'मध्ये एकत्र दिसलेली हुमा कुरेशीला पाहून त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली आहे. दोघांनीही याबाबत काहीही दुजोरा दिला नसला तरी आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

कोण आहे रचित सिंग?
रचित प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि महत्त्वाकांक्षी अभिनेता आहे. आलिया भट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांसोबत त्याने अभिनय प्रशिक्षक म्हणूनही काम केल्याचे बोलले जाते. रचित रवीना टंडनच्या 'कर्मा कॉलिंग' या वेब सीरिजमध्येही दिसला आहे, ज्यामध्ये त्याने वेदांतची भूमिका साकारली होती.

रचितच्या आधी हुमाने या व्यक्तीला केलंय डेट?
रचितच्या आधी हुमाने दिग्दर्शक आणि पटकथा लेखक मुद्दसर अजीजला डेट केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी दोघे वेगळे झाले. सुमारे तीन वर्षे डेट केल्यानंतर हुमा आणि मुद्दसर यांचे ऑक्टोबर २०२२ मध्ये ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते.

Web Title: After Sonakshi Sinha, this actress will be tied up in marriage, sparking the talk of marriage with the multi-millionaire actor