मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक फोटो पाहून करीना कपूरने विचारला अजब प्रश्न, ज्याची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 17:49 IST2021-01-02T17:48:27+5:302021-01-02T17:49:08+5:30

करीना शिवाय मलायका आणि अर्जुनच्या या फोटोवर क्रिती सनॉन, संजय कपूर, महीप कपूर आणि भावना पांडेसारखे कलाकार प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

After seeing the romantic photo of Malaika and Arjun, Kareena Kapoor asked a strange question, which is being discussed | मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक फोटो पाहून करीना कपूरने विचारला अजब प्रश्न, ज्याची होतेय चर्चा

मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक फोटो पाहून करीना कपूरने विचारला अजब प्रश्न, ज्याची होतेय चर्चा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर न्यू इअर सेलिब्रेट करण्यासाठी सध्या गोव्यात आहेत. तिथे मलायका आणि अर्जुन सोबत तिची बहिण अमृता अरोरा, तिचा नवरा शकील लडख आणि मलायकाचा मुलगा अरहानदेखील आहे. मलायका गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गोव्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र गोव्यातून पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या निमित्ताने मलायकाने अर्जुनसोबतचे स्पेशल फोटो शेअर केला आहे. आता तिच्या या फोटोवर जवळची मैत्रीण करीना कपूरने कमेंट केली आहे. ज्याची चर्चा होताना दिसते आहे.

मलायका अरोरानेअर्जुन कपूरसोबत जो फोटो शेअर केला आहे. ज्यात ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बसले आहेत. हा फोटो शेअर करत मलायकाने लिहिले की, ही एक नवीन सकाळ आहे, हा एक नवीन दिवस आहे. हे एक नवीन वर्ष आहे. या फोटोवर करीना कपूर खानने प्रश्न विचारत कमेंट केले की, माझे दोन फेव्हरिट्स, मेन्यूमध्ये आज काय आहे?


करीना शिवाय मलायका आणि अर्जुनच्या या फोटोवर क्रिती सनॉन, संजय कपूर, महीप कपूर आणि भावना पांडेसारखे कलाकार प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यांचे चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. आतापर्यंत या फोटोला ६ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. 


मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी दोघांनी घरीच स्वतःला क्वारंटाइन केले होते. त्यानंतर दोघे कोरोना मुक्त झाले होते.

Web Title: After seeing the romantic photo of Malaika and Arjun, Kareena Kapoor asked a strange question, which is being discussed