प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची नेटक-यांनी घेतली मजा; नाव दिले ‘थिक जोनास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:28 IST2019-07-24T13:27:07+5:302019-07-24T13:28:16+5:30

प्रियंकापाठोपाठ तिचा पती निक जोनास हाही असाच ट्रोल होतोय. कारण आहे, त्याचा एक शर्टलेस फोटो.

after priyanka chopra smoking nick jonas shirtless swimwear photos viral fan make joke | प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची नेटक-यांनी घेतली मजा; नाव दिले ‘थिक जोनास’

प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची नेटक-यांनी घेतली मजा; नाव दिले ‘थिक जोनास’

ठळक मुद्दे निक जोनास याचा ‘मिड वे’ हा सिनेमा यंदा ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.  

प्रियंका चोप्राने गत 18 जुलैला मियामी येथे आपला वाढदिवस साजरा केला. या सेलिबे्रशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातल्या एका फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोत प्रियंका स्मोकिंग करताना दिसली होती. यावरून लोकांनी प्रियंकाला चांगलेच फैलावर घेतले होते. आता तुझा अस्थमा कुठे गेला? असा खोचक सवालही लोकांनी केला होता. प्रियंकाने लोकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष केले. पण आता प्रियंकापाठोपाठ तिचा पती निक जोनास हाही असाच ट्रोल होतोय. कारण आहे, त्याचा एक शर्टलेस फोटो.

होय, निकचा एक शर्टलेस फोटो लीक झाला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवरून लोकांनी निकला ट्रोल करणे सुरु केले आहे. या फोटोत निक यॉट स्विमवीयरमध्ये आहे. त्याच्या एका हातात शॉवर आहे. पण सगळ्यांत खास म्हणजे, त्याची बॉडी. त्याची बॉडी बघून नेटिजन्सनी निकला ‘थिक जोनास’ असे नाव दिले आहे. निकचे काहीसे सुटलेले पोट पाहून अनेकांनी त्याला ‘डॅड बॉड’ (सुटलेलं शरीर) म्हटले आहे. आता तू बाबा बनायची वेळ आली आहे, अशा शब्दांत काहींनी त्याची मजा घेतली आहे.

गतवर्षी प्रियंका चोप्राने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले होते. साहजिकच या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. प्रियंका आणि निक यांच्या वयातील अंतर चचेर्चा विषय ठरला होता. ३६ वर्षांच्या प्रियंकाने २६ वर्षांच्या निकशी लग्न करावे, हे काही जणांना खटकले होती. यावरूनही दोघांची खिल्लीही उडवली गेली होती.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात बिझी आहे. या सिनेमातून तीबॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. निक जोनास याचाही ‘मिड वे’ हा सिनेमा यंदा ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय.  

Web Title: after priyanka chopra smoking nick jonas shirtless swimwear photos viral fan make joke