'ओडेला २'नंतर तमन्ना भाटिया झळकणार नीरज पांडेच्या सिनेमात?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 08:29 PM2024-03-06T20:29:22+5:302024-03-06T20:29:54+5:30

Tamannaah Bhatia : नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'ओडेला २' या तेलुगू चित्रपटाच्या पोस्टरवर तमन्ना भाटियाचंही नाव होतं. या चित्रपटासोबतच तमन्नाला आणखी एक महत्त्वपूर्ण चित्रपट मिळाल्याचं समजतं.

After 'Odela 2', Tamannaah Bhatia to star in Neeraj Pandey's film?, know about | 'ओडेला २'नंतर तमन्ना भाटिया झळकणार नीरज पांडेच्या सिनेमात?, जाणून घ्या याबद्दल

'ओडेला २'नंतर तमन्ना भाटिया झळकणार नीरज पांडेच्या सिनेमात?, जाणून घ्या याबद्दल

साऊथपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली मोहिनी पसरवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'ओडेला २' या तेलुगू चित्रपटाच्या पोस्टरवर तमन्ना भाटियाचंही नाव होतं. या चित्रपटासोबतच तमन्नाला आणखी एक महत्त्वपूर्ण चित्रपट मिळाल्याचं समजतं. 

सध्या दोन हिंदी आणि दोन दाक्षिणात्य चित्रपटांच्या कामात बिझी असलेली तमन्ना भाटिया निर्माते-दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तमन्ना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून, चित्रपटातील तिच्या जोडीदाराचा म्हणजेच मुख्य भूमिकेतील अभिनेत्याचा शोध अद्याप सुरू आहे. यासाठी फिल्ममेकर्स 'स्पेशल ऑप्स'मधील अभिनेत्याची निवड करण्याच्या विचारात असल्याचं समजतं. चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. मागच्या महिन्यातच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षाअखेरीस चित्रपट प्रदर्शनाची योजना आहे. 

वर्कफ्रंट 
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर महेश बाबूचा गुंटूर करम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तमन्ना भाटिया २०२४ मध्ये निखिल अडवाणीच्या 'वेदा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहमही दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री तामिळ चित्रपट अरनमनई ४ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तमन्नाच्या या दोन्ही चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
 

Web Title: After 'Odela 2', Tamannaah Bhatia to star in Neeraj Pandey's film?, know about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.