नयनतारानंतर आता ही अभिनेत्री बंधणार लग्नगाठ, वयाच्या १० व्यावर्षी केलंय अभिनयात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 17:26 IST2022-07-20T17:23:05+5:302022-07-20T17:26:49+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री नयन तारा हिने 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Nayanthara-Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे.

नयनतारानंतर आता ही अभिनेत्री बंधणार लग्नगाठ, वयाच्या १० व्यावर्षी केलंय अभिनयात पदार्पण
बॉलिवूडप्रमाणेच साऊथ सिनेइंडस्ट्रीदेखील लग्नाचे वारे वाहतायेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री नयन तारा हिने 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Nayanthara-Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. तामिळनाडूच्या महाबलीपूरम येथे या जोडप्याचा शाही विवाहसोहळा पार पडला. नयनतारा तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करते आहे. यानंतर आता साऊथची आणखी एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समजतेय. नयन तारानंतर नित्या मेनन (Nithya Menen) लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे कळतंय.
नित्या मेनन ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीची मोठी स्टार आहे. तिने मल्याळम, तामिळ, तेलगू आणि कन्नड या सर्व भाषांमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 2019 मध्ये 'मिशन मंगल' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली होती.
रिपोर्टनुसार नित्या एका लोकप्रिय मल्याळम अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि ती लवकरच त्याच्यासोबत लग्न करणार आहे. नित्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वीच त्यांची भेट झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि गेल्या काही वर्षांपासून दोघेही एकत्र आहेत. नित्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नित्या मेनन शेवटची 'भीमला नायक'मध्ये दिसली होती. सध्या ती 'मॉडर्न लव्ह मुंबई'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या एपिसोडचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले आहे. नित्याने वयाच्या 10 व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.