मुंबईनंतर समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट, घराची किंमत आहे कोटीच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 19:27 IST2023-05-10T19:27:07+5:302023-05-10T19:27:22+5:30

Samantha Ruth Prabhu : पॅन इंडिया स्टार समांथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

After Mumbai, Samantha Ruth Prabhu bought a luxurious flat in Hyderabad, the price of the house is in crores | मुंबईनंतर समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट, घराची किंमत आहे कोटीच्या घरात

मुंबईनंतर समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट, घराची किंमत आहे कोटीच्या घरात

पॅन इंडिया स्टार समांथा रुथ प्रभू ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. समंथा तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फेब्रुवारी २०२३ मध्ये, अभिनेत्रीने मुंबईत घर विकत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि आता बातम्या येत आहेत की अभिनेत्रीने हैदराबादमध्येही नवीन फ्लॅट घेतला आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या फ्लॅटची किंमत ७.८ कोटी रुपये आहे. सामंथाने लॅविश ३ BHK फ्लॅट खरेदी केला आहे. घरात नैसर्गिक सूर्यप्रकाशही भरपूर असतो. घरासोबत ६ पार्किंग स्लॉट आहेत. ही आलिशान मालमत्ता जयभेरी ऑरेंज काउंटीमध्ये आहे. घरात आधुनिकता आणि अभिजातता यांचा मिलाफ पाहायला मिळेल.

समांथाने मुंबईतही घर घेतले?
काही महिन्यांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, अभिनेत्रीने मुंबईत १५ कोटींचे अपार्टमेंटही खरेदी केले होते. याशिवाय अभिनेत्रीचे जुबली हिल्समध्ये १०० कोटींचे आलिशान घर देखील आहे आणि आता अभिनेत्री आणखी एका नवीन घराची मालक बनली आहे.

सामंथाचा शाकुंतलम हा चित्रपट ठरला फ्लॉप 
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची शाकुंतलम चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सामंथा मुख्य भूमिकेत होती. मात्र, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. देव मोहनही या चित्रपटात होता. या चित्रपटाने जगभरात केवळ ११ कोटींची कमाई केली.

सामंथाचा आगामी चित्रपट
आता अभिनेत्री 'कुशी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री अमेरिकन वेब सीरीज सिटाडेलच्या भारतीय भागामध्ये दिसणार आहे. यात अभिनेता वरुण धवनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title: After Mumbai, Samantha Ruth Prabhu bought a luxurious flat in Hyderabad, the price of the house is in crores