लग्नानंतर अथिया शेट्टी केएल राहुलसोबत दिसली बोल्ड अंदाजात, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:26 IST2023-01-31T13:26:09+5:302023-01-31T13:26:32+5:30

Athiya Shetty And KL Rahul :अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी 23 जानेवारी 2023 रोजी सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्नगाठ बांधली.

After marriage, Athiya Shetty was seen with KL Rahul in a bold look, the video is going viral | लग्नानंतर अथिया शेट्टी केएल राहुलसोबत दिसली बोल्ड अंदाजात, व्हिडीओ होतोय व्हायरल

लग्नानंतर अथिया शेट्टी केएल राहुलसोबत दिसली बोल्ड अंदाजात, व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (K L Rahul) यांनी 23 जानेवारी 2023 रोजी सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला फक्त त्यांच्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती. दोघांची पहिली झलकही लग्नानंतर काही तासांतच पाहायला मिळाली. आता, लग्नानंतर पहिल्यांदाच अथिया आणि केएल एका डिनर डेटवर एकत्र दिसले, जिथे अभिनेत्रीचा लुक आणि पोशाख पाहून सर्व अवाक झाले. 

अथिया आणि केएल राहुलच्या समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघेही खूप सीरियस मूडमध्ये दिसत आहेत आणि पापाराझीशी बोलताना अथियाचा टोनही इतका चांगला वाटला नाही. इतकेच नाही तर तिच्या वागण्यासोबतच अथियाला तिच्या लूकसाठीही खूप ट्रोल केले जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक म्हणत आहेत की, या अभिनेत्रीकडे बघून असे वाटत नाही की तिचे लग्न झाले आहे.

या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की अथियाने सिंदूर लावलेले नाही किंवा तिने गळ्यात मंगळसूत्र घातले नाही. इतकेच नाही तर अभिनेत्रीने जीन्स आणि शर्ट घातला आहे, ज्यामध्ये शर्टच्या वरच्या आणि खालच्या बाजूची अनेक बटणे उघडी आहेत, फक्त मधली दोन बटणे बंद आहेत. अभिनेत्रीचा हा बोल्ड अवतार पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ते म्हणत आहेत की तिच्या हातावरची मेंदीही गेली नाही आणि आतापासून ती अशा कपड्यांमध्ये आणि स्टाईलमध्ये दिसू लागली आहे.

Web Title: After marriage, Athiya Shetty was seen with KL Rahul in a bold look, the video is going viral