KKR जिंकताच शाहरुखकडून घडली मोठी चूक, हात जोडून मागितली माफी! व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:28 IST2024-05-22T13:26:56+5:302024-05-22T13:28:47+5:30

KKR ने काल SRH विरुद्धचा सामना जिंकला. परंतु विजयाच्या आनंदात शाहरुखकडून मोठी चूक घडली आहे. (shah rukh khan, kkr)

after kkr win vs srh shah rukh khan apology to suresh raina akash chopra for disturb | KKR जिंकताच शाहरुखकडून घडली मोठी चूक, हात जोडून मागितली माफी! व्हिडीओ व्हायरल

KKR जिंकताच शाहरुखकडून घडली मोठी चूक, हात जोडून मागितली माफी! व्हिडीओ व्हायरल

काल KKR आणि सनरायजर्स हैद्राबादमध्ये सामना रंगला. यावेळी KKR ने हैद्राबादवर सहज विजय मिळवला. इतकंच नव्हे तर KKR च्या विजयाने हा संघ फायनलचा प्रबळ दावेदार म्हणून ओळखला जातो. शाहरुख खान नेहमीप्रमाणे KKR संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर आलेला. पण यावेळी KKR च्या विजयाचा आनंद साजरा करताना शाहरुखकडून मोठी चूक घडली. इतकंच नव्हे त्याने माफीही मागितली.

शाहरुखकडून घडली मोठी चूक

आपल्या सर्वांना माहितच आहे की IPL 2024 मध्ये शाहरुख खान KKR चा प्रत्येक सामना पाहायला आणि संघाला सपोर्ट करायला मैदानावर हजर असतो. सामना झाल्यावर शाहरुख KKR च्या खेळाडूंना याशिवाय प्रतिस्पर्धी खेळाडूंना चिअर करताना दिसतो. कालचा KKR चा सामना झाल्यावर सुद्धा शाहरुख त्याची लेक सुहाना आणि मुलगा अबरामसोबत मैदानात उतरला. पण नकळतपणे घडलेल्या चुकीमुळे शाहरुखला आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेलची माफी मागावी लागली.

शाहरुखने हात जोडून मागितली माफी

झालं असं की.. शाहरुख सर्वांना अभिवादन करत पुढे येत होता. दुसरीकडे आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल सामन्यानंतर live शो करत होते. शाहरुखला हे माहित नव्हतं. तो नकळतपणे या तिघांसमोर आला. पण जसं त्याला समजलं तसं त्याने डोक्यावर हात मारला. तो मागे गेला. जाताना त्याने आकाश, सुरेश, पार्थिव यांना मिठी मारली. आणि पुन्हा एकदा हात जोडून माफी मागितली. आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल यांच्या लाईव्ह शोमध्ये व्यत्यय आणल्याने शाहरुखने नम्रपणे माफी मागितली. हा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होतोय.

 

Web Title: after kkr win vs srh shah rukh khan apology to suresh raina akash chopra for disturb