कियारा अडवाणी पाठोपाठ 'डॉन ३' मधून 'या' अभिनेत्याची एक्झिट, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:51 IST2025-07-17T11:49:11+5:302025-07-17T11:51:31+5:30
गेल्या वर्षभरापासून फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३'या चित्रपटाची चर्चा आहे.

कियारा अडवाणी पाठोपाठ 'डॉन ३' मधून 'या' अभिनेत्याची एक्झिट, काय आहे कारण?
Don-3 Movie Update: फरहान अख्तर (Farhaan Akhtar) दिग्दर्शित 'डॉन ३' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सिनेरसिकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची चर्चा आहे. १९७८ साली आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या डॉन सिनेमाचा रिमेक बनवत फराह अख्तरने नवीन कथा प्रेक्षकांसमोर आणली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता डॉन तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यानंतर त्यामध्ये कोण असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. दरम्यान, डॉन-३ मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असल्याची माहिती समोर आली. पण, त्याव्यतिरिक्त चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीचं नाव समोरं आलं होतं. त्याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
अलिकडेच कियारा अडवाणीने प्रेग्न्सींच्या कारणास्त 'डॉन-३' मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता विक्रांत मेसीनेही चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची अपडेट मिळते आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, किआरा अडवाणीनंतर विक्रांत मेस्सीनेही चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. फरहान अख्तरच्या या चित्रपटात विक्रांत एका स्कॅमरच्या भूमिकेत दिसणार होता. त्यासाठी अभिनेत्याने ट्रेनिंगही घेतल्याचं सांगण्यात येतंय. रिपोर्टनुसार, विक्रांतला त्यांचं पात्र फारसं प्रभावी वाटलं नाही, त्यामुळे त्याने या प्रोजेक्टमधून बाहेर पडणं पसंत केलं असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा विक्रांत मेस्सीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने 'डॉन-३' मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असल्याची घोषणा केली होती. तेव्हा त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, कारण लोकांना या भूमिकेत शाहरुख खान पहायचं होतं. रिपोर्ट्सनुसार, 'डॉन ३' चे शूटिंग जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट वर्षाअखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कृती सेनन हिचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका असण्याची चर्चा आहे.