'गदर २'नंतर आता 'बॉर्डर २' येणार भेटीला, सनी देओलसोबत झळकणार हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 05:48 PM2023-12-05T17:48:37+5:302023-12-05T17:49:02+5:30

Border 2 : सनी देओलचा आगामी चित्रपट 'बॉर्डर २'बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.

After 'Gadar 2', now 'Border 2' is coming, the actor will be seen with Sunny Deol | 'गदर २'नंतर आता 'बॉर्डर २' येणार भेटीला, सनी देओलसोबत झळकणार हा अभिनेता

'गदर २'नंतर आता 'बॉर्डर २' येणार भेटीला, सनी देओलसोबत झळकणार हा अभिनेता

'गदर २'(Gadar 2)च्या अफाट यशानंतर आता सनी देओल 'बॉर्डर २' (Border) चित्रपटामुळे चर्चेत आहे. १९९७ साली रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर बॉर्डर चित्रपटाबद्दल सातत्याने चर्चा ऐकायला मिळत आहे. दरम्यान आता या चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की, जेपी दत्ता यांच्या या चित्रपटात सनी देओलसोबत आयुषमान खुरानादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी आयुषमान खुरानाचे नाव फायनल करण्यात आले आहे. अभिनेत्याने बॉर्डर २ साइन केला आहे. मात्र, सनी देओलने हा चित्रपट अद्याप साइन केलेला नाही. तो अजूनही या युद्धपटाचा विचार करत आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात आयुषमान व्यतिरिक्त इतर कलाकार दिसणार आहेत.

चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील वर्षाच्या उत्तरार्धापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. बॉर्डरबद्दल बोलायचे झाले तर जेपी दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात सनी देओलशिवाय सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पूजा भट्ट, तब्बू आदींच्याही प्रमुख भूमिका होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूषण कुमार आणि जेपी दत्ता या चित्रपटाबाबत अनुराग सिंह यांच्याशी चर्चा करत आहेत. अनुराग सिंहने केसरसारखा उत्तम चित्रपट बनवला आहे. निर्मात्यांनी बॉर्डरचा सीक्वल मोठ्या बजेटमधील युद्धपट बनवण्याची योजना आखली आहे, ज्यासाठी त्यांना भारतातील सर्वोत्तम तंत्रज्ञ या चित्रपटात सामील करायचे आहेत.

Web Title: After 'Gadar 2', now 'Border 2' is coming, the actor will be seen with Sunny Deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.