ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:08 IST2025-08-05T10:06:24+5:302025-08-05T10:08:38+5:30
Dhanush: अभिनेता धनुष लवकरच 'तेरे इश्क में' या सिनेमात झळकणार आहे.

ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
अभिनेत्री मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)ची बर्थडे पार्टीची खूप चर्चा झाली, या पार्टीत साउथचा स्टार धनुष(Dhanush)ही दिसला होता. 'सन ऑफ सरदार २' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी धनुष मुंबईत गेला होता, ज्यामध्ये मृणाल ठाकूर आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका कार्यक्रमात धनुष आणि मृणाल आनंदाने बोलत असल्याचे दिसून आले, ज्याचा एक व्हिडीओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत आहे.
व्हिडीओमध्ये धनुष आणि मृणाल ठाकूर बोलताना दिसले. मृणाल धनुषच्या जवळ जाते आणि काहीतरी बोलताना दिसते आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'धनुष आणि मृणाल ठाकूर डेट करत आहेत का?' व्हिडीओवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, ''अद्याप याची पुष्टी झालेली नाही, परंतु ही हिंट आहे.'' दुसऱ्याने अंदाज लावला आहे, ''मला वाटते की ते फक्त मित्र आहेत.'' एका व्यक्तीने लिहिले की, ''खरंच? मला विश्वास बसत नाहीये.''
Dhanush and Mrunal Thakur are dating? pic.twitter.com/ItWYJdsm8a
— Aryan (@Pokeamole_) August 3, 2025
'तेरे इश्क में'च्या पार्टीत दिसलेली मृणाल
जुलैमध्ये धनुषचा आगामी सिनेमा 'तेरे इश्क में'साठी आयोजित केलेल्या पार्टीत मृणाल ठाकूर देखील सहभागी झाली होती. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सनॉन दिसणार आहे. कनिका ढिल्लोंने ३ जुलै रोजी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले होते, ज्यामुळे तिच्या फॉलोअर्सना या कार्यक्रमाची झलक पाहायला मिळाली. या फोटोमध्ये मृणाल ठाकूर आणि धनुष एकाच फ्रेममध्ये हसताना दिसत आहेत. 'तेरे इश्क में' चित्रपटाची टीम देखील बॅकग्राउंडमध्ये दिसली होती.
धनुष झळकणार 'तेरे इश्क में' चित्रपटात
धनुष आणि मृणाल ठाकूर दोघांनीही अफेअरच्या अफवांवर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. धनुषचे पूर्वी रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याशी लग्न झाले होते. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांची पहिली भेट त्यांच्या 'कढल कोंडें' (२००३) या चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी झाली होती. कामाबद्दल बोलायचे झाले तर, धनुष आणि क्रिती सनॉनचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.