घटस्फोटानंतर मलायकाने मागितली ‘पोटगी’साठी एवढी रक्कम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 21:45 IST2016-12-27T21:45:35+5:302016-12-27T21:45:35+5:30
अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांच्यात आता काहीच उरले नाही, त्यानी घटस्फोटासाठी कौटुबिक न्यायालयात अर्ज सादर केला आहे. ...

घटस्फोटानंतर मलायकाने मागितली ‘पोटगी’साठी एवढी रक्कम?
मलायका अरोरा व अरबाज खान यांनी मुंबई येथील बांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा रितसर अर्ज दिला असून त्यावर दुसरी सुनावणी झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसºया समुपदेशनाला दोघांनी हजेरी लावली होती. सध्या दोघांचा ‘कुलिंग आॅफ पिरियेड’ सुरू असून मलायकाने घटस्फोटानंतर पोटगी म्हणून अरबाजकडे १० कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे समजते. अरबाज खानने मलायकाची ही मागणी मान्य केली असून ही रक्कम देण्याची तयारी त्याने दर्शविली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता फार कमी आहे. सध्या अरबाज व मलायका यांची दोन्ही मुले आई मलायकाकडेच आहेत. मात्र मुलगा अरहान कुणाकडे राहिल यावर सध्या दोघांत एकमत व्हायचे आहे. अरहानच्या वाढदिवसाला मलायका व अरबाज एकत्र दिसले होते, त्यावेळी दोघही एकत्र येतील अशी आशा निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या वाढदिवसाला सलमान खान सोडून संपूर्ण खान कुुटुंबाने हजेरी लावली होती. अरहानने नुकतीच १४ वर्षे पूर्ण केली आहेत.
१९९८ साली अरबाज खान व मलायका अरोरा यांनी लग्न केले होते. १८ वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांत वितुष्ट येण्यास सुरुवात झाली. दरम्यान मलायकाचे नाव अर्जुन क पूरशी जोडण्यात आले. मलायका व अरबाज यांच्या कुटुंबियांनी दोघेही एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले होते. मात्र यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. नुकतीच मलायका आपली बेस्ट फ्रेण्ड करिना कपूरच्या घरी आयोजित ख्रिसमस पार्टीत दिसली होती.