'धुरंधर २'नंतर संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची चर्चा, सिनेमाची रिलीज डेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:36 IST2026-03-26T15:35:54+5:302026-03-26T15:36:32+5:30
संजय दत्तच्या ‘आखरी सवाल’ चित्रपटाची पहिली झलक समोर येताच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनकथित सत्य पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मांडले जाणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता चित्रपटाचा प्रभावी नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

'धुरंधर २'नंतर संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची चर्चा, सिनेमाची रिलीज डेट समोर
'धुरंधर २'ची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच संजय दत्त त्याच्या नव्या सिनेमातून पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय दत्त आता ‘आखरी सवाल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबाबत मोठी अपडेट मिळाली आहे. ‘आखरी सवाल’ या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. संजय दत्तच्या ‘आखरी सवाल’ चित्रपटाची पहिली झलक समोर येताच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनकथित सत्य पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मांडले जाणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता चित्रपटाचा प्रभावी नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
पोस्टरमध्ये मोठ्या प्रश्नचिन्हाच्या पार्श्वभूमीवर संजय दत्तचा गंभीर चेहरा दिसत असून तो चित्रपटाच्या विषयाची झलक देतो. “तो प्रश्न जो भारताने कधी विचारणं थांबवलं नाही” ही दमदार टॅगलाइन चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढवते. ‘आखरी सवाल’ प्रेक्षकांसमोर भारतातील सर्वात जुन्या आणि संघटित संस्थांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाची कथा मांडणार आहे. १९२५ मध्ये केशव बलिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या बैठकीवरही चित्रपट प्रकाश टाकणार आहे. राष्ट्रासाठी निस्वार्थ सेवाभावाच्या विचारांवर आधारित हा चित्रपट अनेक अनकथित गोष्टी उलगडण्याचे वचन देतो.
नीम ट्री एंटरटेनमेंट आणि निखिल नंदा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निखिल नंदा, धनराज नथवानी आणि संजय दत्त निर्मित ‘आखरी सवाल’मध्ये संजय दत्त, अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांची दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अनुभवी कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांवर ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांनी केलं आहे. त्यांनी २०२१ मध्ये ‘पिकासो’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्पेशल मेंशन मिळाले होते. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. संजय दत्तचा ‘आखरी सवाल’ चित्रपट १५ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.