n style="color: rgb(34, 34, 34); font-size: 11pt; font-family: arial; vertical-align: baseline;">जुन्या जमान्यातील अभिनेत्रींसाठी सिनेमात काम करणं म्हणजे जणू काही मोठं दिव्य होतं. चूल आणि मूल इतकंच एवढंच महिलांनी पाहावं असं बोललं जायचं. त्यामुळे सिनेमात काम करणं, नृत्य करणं म्हणजे हमखास विरोध मानला जात असे. अशाच विरोधाचा सामना कथ्थक नृत्यांगणा आणि प्रसिद्ध अभिनेत्री सितारा देवी यांना करावा लागला होता. ८ नोव्हेंबर १९२० साली कलकत्ता इथे त्यांचा जन्म झाला होता. सितारा देवी यांचं मूळ नाव धनलक्ष्मी असं होतं. लाडाने त्यांना धन्नो नावाने बोलावलं जात असे. हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांना सितारा देवी हे नाव मिळालं. मात्र धन्नो ते यशस्वी अभिनेत्री सितारा देवी असा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. कारण सुरुवातीपासून तथाकथित समाजाने त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले. सितारा देवी यांचे वडील महाराज सुखदेव यांनी लाडकी लेक धन्नोला नृत्याचे धडे देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला समाजातून विरोध झाला. इतकंच नाही तर धन्नोला वेश्या म्हणूनही हिणवण्यात आलं. तरीही महाराज सुखदेव डगमगले नाहीत किंवा त्यांचा निर्णय बदलला नाही. त्यांनी लेकीला नृत्याचे शिक्षण दिले. सितारा देवी यांनी एक नृत्याचे प्रशिक्षण देणारं केंद्र सुरु केले होते. या ठिकाणी त्यांनी वेश्या व्यवसाय करणा-या महिलांच्या मुलांना नृत्याचे धडे दिले. या मुलांसह त्यांनी नृत्यसुद्धा केले होते. सितारा देवी यांचे खासगी आयुष्यसुद्धा वादळी ठरलं. त्यांनी तीन तीन लग्न केली होती. पहिलं लग्न त्यांनी नासिर अहमद खान यांच्यासह केले. दुसरं लग्न त्यांनी मुगल-ए-आजम सिनेमाचे दिग्दर्शक आसिफ यांच्यासह केले. त्यांची दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. मग सितारा देवी यांनी तिसरं लग्न केले. डॉन सिनेमाचे निर्माते कमल बरोट यांचे बंधू प्रताप बरोट यांच्याशी सितारा देवींनी तिसरं लग्न केलं. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव रंजित बरोट असं आहे. रंजित संगीत दिग्दर्शक आणि गायक आहे.
![]()
![]()
![]()
Web Title: After dancing, the actress was criticized by the then society as a prostitute, three times stuck in marriage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.