या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला, ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना दिशा- टायगर दिसले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 03:23 PM2020-12-19T15:23:54+5:302020-12-19T15:24:01+5:30

दिशा आणि टायगर श्रॉफ दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा रंगतात. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.दिशा पटानी टायगरसह दिसत नसली तरी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ तिची खास मैत्रीण आहे.

After Break Up Rumour Disha Patani and Tiger Shroff Came Together In Dubai; photos go viral on the internet | या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला, ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना दिशा- टायगर दिसले एकत्र

या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला, ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना दिशा- टायगर दिसले एकत्र

googlenewsNext

'टायगर आणि दिशा दोघांमध्ये वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळते. यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र गेल्या वर्षातं  या लव्ह बर्ड्समध्ये दुरावा आल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु होत्या. दोघांचं ब्रेकअप झाल्याचंही बोललं जात होतं. दोघेही फार एकत्र पाहायला मिळाले नाहीत.मात्र  दुबईमधील एका कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. या निमित्ताने दोघेही  एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे दुबईतील काही फोटो व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर या फोटोंनी चांगलीच चर्चा सुरु केली आहे.

 

मनमोहक आणि तितक्याच ग्लॅमरस स्टाइलचे ड्रेस परिधान करत रेड कार्पेटवर एंट्री केलेल्या या सेलिब्रिटींनी या सोहळ्याला चारचाँद लावले. या सोहळ्यातील प्रत्येकाची स्टाइल अन् अदा घायाळ करणारी अशीच होती. तरीही या सोहळ्यात सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या त्या दिशा आणि टायगर श्रॉफ यांनी.दुबईमधल्या कार्यक्रमात दोघही चाहत्यांबरोबरही पोज देताना दिसत आहेत.

यावेळी रेड कार्पेटवर दोघांच्या स्टाइलचा जलवा तर दिसलाच, शिवाय दोघांनी एकत्र कॅमे-यांसमोर पोझही दिल्या.यावेळी टायगरसोबत बहिण कृष्णाही होती. कृष्णाही दोघांसह सेल्फी घेत असल्याचे आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या फोटोसेशनमधून या लव्हबर्ड्समधील दुरावा मिटला असून ब्रेकअपच्या चर्चा केवळ अफवाच असल्याचं सांगण्याचा जणू त्यांनी प्रयत्न केला आहे. 

दिशा आणि टायगर श्रॉफ दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा रंगतात. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.दिशा पटानी टायगरसह दिसत नसली तरी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ तिची खास मैत्रीण आहे.टायगर आणि दिशा यांनी कधीच त्यांच्या नात्याबाबत  जाहीर कबुली दिली नाही.दोघेही याला खास मैत्री म्हणत असून माध्यमांसमोर मात्र त्यांचं नातं लपून राहिलेलं नाही.

 

सध्या दोघीनींही आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं असून सुट्टी एन्जॉय करत आहेत.दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. त्यामुळे हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं इथेच मिळतील.
 

Web Title: After Break Up Rumour Disha Patani and Tiger Shroff Came Together In Dubai; photos go viral on the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.