अरबाज खाननंतर आता मलायकाही लग्नासाठी तयार? म्हणाली, 'जो विचारेल त्याच्याशी लग्न करेन'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:14 AM2023-12-29T10:14:59+5:302023-12-29T10:16:09+5:30

मलायकाचं उत्तर ऐकून सगळेच चक्रावले

After Arbaaz Khan now Malaika Arora also ready for marriage said will marry whoever asks | अरबाज खाननंतर आता मलायकाही लग्नासाठी तयार? म्हणाली, 'जो विचारेल त्याच्याशी लग्न करेन'

अरबाज खाननंतर आता मलायकाही लग्नासाठी तयार? म्हणाली, 'जो विचारेल त्याच्याशी लग्न करेन'

अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न करत सर्वांना धक्का दिला. मलायका अरोरासोबत (Malaika Arora)  घटस्फोट झाल्यानंतर अरबाजच्या आयुष्यात जॉर्जिया आली. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आल्या आणि अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत दुसरा संसार थाटला. आता अरबाजनंतर मलायका अरोराही दुसरं लग्न करणार का? या प्रश्नाचं उत्तर स्वत: तिने एका रिएलिटी शोमध्ये दिलं आहे.

'झलक दिखला जा' या डान्स शोमध्ये मलायका अरोरा परिक्षकाच्या भूमिकेत आहे. यातील एका सेगमेंटमध्ये फराह खान मलायकाला विचारते, '2024 मध्ये मलायका सिंगल पॅरेंट कम अभिनेत्री वरुन जबल पॅरेंट कम अभिनेत्री बनणार आहे?' तर मलायका म्हणते,'म्हणजे आता मला परत कोणाला तरी कडेवर घ्यावं लागणार?' तिच्या उत्तरावर सगळेच हसतात. नंतर गौहर खान मलायकाला विचारते, 'याचा अर्थ पुढच्या वर्षी तू लग्न करणार का?' तर मलायका म्हणते जर कोणी असेल तर नक्की मी लग्न करेन.' तर फराह म्हणते,'कोणी आहे नाही खूप जण आहेत'. यावर मलायका म्हणते,' म्हणजे कोणी मला विचारलं लग्नासाठी तर मी हो म्हणेन' फराह म्हणते,'म्हणजे कोणीही विचारेल तर त्याच्याशी तू लग्न करशील?' यावर सगळेच हसतात. हा प्रकार चुकीचा आहे असं अर्शद वारसी हसतच म्हणतो. सध्या 'झलक दिखला जा' चा हा प्रोमो खूपच व्हायरल होतोय. 

मलायका आणि अर्जुन कपूर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. २०२४ मध्ये तरी दोघं लग्न करतील का अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसंच हिचं काय अर्जुनसोबत ब्रेकअप झालं का? असेही प्रश्न नेटकऱ्यांने पडले आहेत. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. त्यांच्या जोडीला कायमच ट्रोल केलं जातं.

Web Title: After Arbaaz Khan now Malaika Arora also ready for marriage said will marry whoever asks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.