आधी अपेंडिक्सची सर्जरी, आता झाला चिकनगुनिया; आमिर खानची एक्स पत्नी किरण रावची झाली 'अशी' अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:34 IST2026-02-18T11:34:12+5:302026-02-18T11:34:42+5:30
किरण रावला चिकनगुनियाचं निदान झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत किरणने याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

आधी अपेंडिक्सची सर्जरी, आता झाला चिकनगुनिया; आमिर खानची एक्स पत्नी किरण रावची झाली 'अशी' अवस्था
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव पुन्हा आजारी पडली आहे. किरण रावला चिकनगुनियाचं निदान झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत किरणने याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. सध्या किरण राव यावर उपचार घेत असून या कठीण काळात मित्रमैत्रिणींची सोबत तिला मिळत आहे.
किरण रावने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती सोफ्यावर झोपून आराम करताना दिसत आहे. तर तिच्या बाजूला तिची मांजरदेखील बसल्याचं दिसत आहे. "मला आता चिकनगुनिया झाला आहे आणि ही माझी मिरी माझ्यावर काळजीपूर्वक नजर ठेवत आहे", असं तिने म्हटलं आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने म्हटलं आहे की "हळूहळू बरी होत आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनी पाठवलेले शुभेच्छांचे कार्ड आणि पुस्तक वाचत आहे. पण हे दुखणं लवकर बरं होणार नाही. तुम्हीही काळजी घ्या", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

किरण रावची २०२५ च्या डिसेंबर महिन्यातच अपेंडिक्सची सर्जरी झाली होती. तेव्हा तिने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती. आता काही महिन्यांतच तिला चिकनगुनिया झाल्याने ती पुन्हा आजारी पडली आहे. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. किरण राव ही आमिरची दुसरी पत्नी आहे. २००५मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. मात्र २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.