१५ वर्षांनंतर रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमध्ये परतणार साऊथचा हा सुपरस्टार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 19:06 IST2018-07-10T18:56:41+5:302018-07-10T19:06:47+5:30
‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूर व आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. याशिवाय चाहत्यांसाठी एक आणखी एक सरप्राईज आहे.

१५ वर्षांनंतर रणबीर कपूरसोबत बॉलिवूडमध्ये परतणार साऊथचा हा सुपरस्टार!
रणबीर कपूरच्या ‘संजू’वर कौतुकाचा वर्षाव झाला. यातील रणबीरच्या अभिनयाची कधी नव्हे इतकी प्रशंसा झाली. ‘संजू’नंतर आता रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर व आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. याशिवाय ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने चाहत्यांसाठी एक आणखी खूप मोठे सरप्राईज आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’मध्ये साऊथचा सुपरस्टार नागार्जुन हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला बघावयास मिळणार आहे.
नागार्जुन दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये वापसी करण्यास आतूर होता. पण त्याला मनासारख्या भूमिका मिळत नव्हत्या. पण ‘ब्रह्मास्त्र’साठी त्याला विचारणा झाली आणि त्याने ही संधी कॅश केली.
नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता. आता १५ वर्षांनंतर नागार्जुन पुन्हा बॉलिवूडमध्ये परततो आहे. साहजिकच ही बातमी त्याच्या चाहत्यांना सुखावणारी आहे.
‘ब्रह्मास्त्र’बद्दल सांगायचे तर हा बॉलिवूडचा पहिला फँटसी चित्रपट आहे. तो तीन भागांत रिलीज होणार आहे. रणबीर यात सुपरहिरोच्या रूपात दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.