तब्बल १२ वर्षांनंतर संजय दत्त झळकणार या अभिनेत्यासोबत, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 06:30 IST2019-09-16T06:30:00+5:302019-09-16T06:30:00+5:30
संजय दत्तचा 'प्रस्थानम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तब्बल १२ वर्षांनंतर संजय दत्त झळकणार या अभिनेत्यासोबत, वाचा सविस्तर
संजय दत्तचा 'प्रस्थानम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टाने केले आहे. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून संजय दत्त तब्बल १२ वर्षानंतर बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफसोबत झळकणार आहे.
संजय दत्त व जॅकी श्रॉफ तब्बल १२ वर्षानंतर 'प्रस्थानम' सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्या दोघांनी एकत्र शेवटचं २००७ साली एकलव्यःद रॉयल गार्ड या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याशिवाय ते दोघं बऱ्याच चित्रपटात एकत्र झळकले आहेत.
याबद्दल जॅकी श्रॉफ म्हणाला की, तब्बल बारा वर्षांनंतर मित्रासोबत मी काम करतोय. मला विचाराल तर १२ वर्षे म्हणजे खूप वेळ लागला. आम्ही याआधीच एकत्र काम करायला हवं होतं. कदाचित योग्य वेळ आली नव्हती. अखेर 'प्रस्थानम'च्या निमित्ताने ती संधी आलीच. मित्रासोबत काम करण्याची वेगळीच मजा असते. पुन्हा जुन्या गोष्टीत रमता आलं, आठवणींना उजाळा मिळाला. खरंच ही खूप आनंदाची बाब आहे.
'प्रस्थानम' चित्रपटात संजय दत्त व जॅकी श्रॉफ व्यतिरिक्त मनीषा कोईराला, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर व सत्यजीत दुबे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'प्रस्थानम' या चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी आहे. हा चित्रपट तेलगू सिनेमा ‘प्रस्थानम’चा हिंदी रिमेक आहे.
अभिनेता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला हिंदी सिनेमा ‘प्रस्थानम’ हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.