ड्रग्सच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला आफताब शिवदासानी; म्हणाला, "मी काहीही केलं तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:57 IST2025-11-17T13:56:37+5:302025-11-17T13:57:10+5:30
'मस्ती ४' सिनेमानिमित्त आफताबची मुलाखत, स्वत:वरील आरोपांबद्दल म्हणाला...

ड्रग्सच्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलला आफताब शिवदासानी; म्हणाला, "मी काहीही केलं तरी..."
अभिनेता आफताब शिवदासानी बऱ्याच काळानंतर सिनेमात दिसणार आहे. रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉयसोबत त्याचा 'मस्ती ४'येत आहे. 'मस्ती'चे आधीचे सर्व भाग गाजले. प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता चौथ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. नुकतंच आफताबने सिनेमानिमित्त दिलेल्या मुलाखतीत ड्रग्स केसवर प्रतिक्रिया दिली.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत ड्रग्स केसवर आफताब शिवदासानी म्हणाला, 'मी माझ्याबाबतीत ऐकलेली ही सर्वात मजेशीर अफवा आहे'. या अफवा ऐकूनही शांत कसा राहतो? यावर तो म्हणाला, "सत्य आवाज करत नाही हे मी आयुष्यात खूप आधीच शिकलो होतो. सत्य नेहमी शांत असतं. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नसते. फक्त हीच थिअरी कायम ध्यानात ठेवा म्हणजे कोणालाच जस्टिफाय करण्याची गरज लागणार नाही."
तो पुढे म्हणाला, "मी कधीच स्वत:विषयी काही बोलत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. कारण जे खोटं आहे त्यावर विचार करुन मी माझी झोप का मोडू? माझं सत्य मला माहित आहे. जी माझी माणसं आहेत त्यांना सगळंच माहितच आहे. मी काहीही करो या न करो लोकांना जर मी केलंच आहे असं मानायचं असेल तर ते तेच मानणार आहेत. मी अगदी गच्चीवर जाऊन ओरडूनही सांगितलं की, 'भैय्या, मैने नही किया' तरी काय फायदा होणार आहे."
सेटवर अॅटिट्यूड दाखवण्याबद्दल आफताब म्हणाला, "जर मी काम करताना अॅटिट्यूड दाखवत असतो तर मी इंडस्ट्रीत टिकलोच नसतो. तसंच माझे अनेक दुश्मनही असते. लोक माझ्याबद्दल वाईट बोलले असते. लोकांना मी आवडत नसलो तरी त्यांच्या मनात माझ्याबद्दलही काही राग नाही."