अभिनेत्रींशी अफेअर अन् तीन लग्न! शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 17:54 IST2024-01-23T17:52:28+5:302024-01-23T17:54:44+5:30

शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर सानिया मिर्झाने शेअर केलेला फोटो चर्चेत

Affair with actresses and three marriages! Sania Mirza shared a photo for the first time after her divorce from Shoaib Malik | अभिनेत्रींशी अफेअर अन् तीन लग्न! शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला फोटो

अभिनेत्रींशी अफेअर अन् तीन लग्न! शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला फोटो

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सानियाचा पती क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी निकाह करत तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. सनाबरोबर लग्नाचे फोटो शेअर करत शोएब मलिकने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर शोएबला ट्रोलही केलं गेलं. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर आता सानियाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. 

शोएब मलिकने सनासोबत निकाह केल्यानंतर सानियाने पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. सानियाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सानियाने फॉर्मल आऊटफिट परिधान केलं आहे. सानियाचा हा बॉस लेडी अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. "ऑस्ट्रेलिया ओपनसाठी फक्त १० दिवस बाकी आहेत" असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी २०१०मध्ये निकाह करत संसार थाटला होता. तेव्हा सानियाला प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं होतं. १४ वर्षांनंतर सानियाने मुस्लीम पद्धतीने खुला करत शोएबशी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना इझहान हा मुलगा आहे. शोएबबरोबर सानियाचं दुसरं लग्न होतं. सानियाआधी त्याने आयेशा सिद्दीकी या भारतीय महिलेशी विवाह केला होता. 

Web Title: Affair with actresses and three marriages! Sania Mirza shared a photo for the first time after her divorce from Shoaib Malik