हनी सिंगने बादशाहची केली मोठी फसवणूक?, कोऱ्या कागदावर करायला लावल्या सह्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:17 IST2023-07-17T14:13:19+5:302023-07-17T14:17:49+5:30

हनी सिंग आणि बादशाह यांच्या वादही सगळ्यांना माहिती आहे. कधीकाळी दोघे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते.

Adshah reveals reason behid fight with yoyo honey singh says self centered rapper dodged his calls made him sign blank papers | हनी सिंगने बादशाहची केली मोठी फसवणूक?, कोऱ्या कागदावर करायला लावल्या सह्या अन्...

हनी सिंगने बादशाहची केली मोठी फसवणूक?, कोऱ्या कागदावर करायला लावल्या सह्या अन्...


हनी सिंग आणि वाद हे समीकरण आता काही नवं राहिलेलं नाही. तसेच हनी सिंग आणि बादशाह यांच्या वादही सगळ्यांना माहिती आहे. कधीकाळी दोघे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते. दोघांनी मिळून 'खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’, ‘दिल्ली के दीवाने’ अशी हिट गाणी दिली होती. या दोघांमध्ये नेमकी वादाची ठिणगी कशी पडली हे फार कमी लोकांना माहिती आहे. 

हनी आणि बादशाह या दोघांनी मिळून 'माफिया मुंडिर' नावाचा बँड तयार केला. ज्याला लोकांनी खुप पसंतही केलं होतं, पण 2012 मध्ये हा बँड फुटला. त्यानंतर दोघांमध्ये अनेक वादही झाले. रॅपर बादशाहने हनी सिंग आणि त्याच्यातील भांडणाला हनी कसा जबाबदार होता हे सांगितलं आहे. एका पॉडकास्टमध्ये बादशाहने यावर भाष्य केलं.

त्याने सांगितले की, सुरुवातीला फक्त तो आणि हनी सिंग 'माफिया मुंडिर या ग्रुपमध्ये होते, पण नंतर हनी सिंगने एकट्यानेच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि येथूनच त्यांच्यात वाद सुरू झाला. हनी सिंगमुळे ग्रुप तुटला आणि तो 5 वर्षे वाईट टप्प्यातून गेला.

बादशाह म्हणाला, “माफिया मुंडिर ही एक कल्पना होती. मुख्य म्हणजे फक्त मी आणि हनी होतो. 2009 मध्ये माझे आणि हनीचे भांडणं झाले. मी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझा कॉल उचलला नाही. त्यांना काही कोऱ्या करारावर सह्याही करून दिल्या होत्या. हनी सिंग हा त्यावेळी खुप आत्मकेंद्रित आहे. जो फक्त त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत द्यायचा दुसऱ्याचे मतं त्याला पटायची नाही. त्यामुळे आमचा बँड तुटला. 

रिपोर्टनुसार बादशाह आणि हनी सिंग एकमेकांच्या खूप जवळ होते. मात्र बादशाहने माफिया मुंडिर सोडल्यानंतर दोघांमध्ये दुरावा आलाय 

Web Title: Adshah reveals reason behid fight with yoyo honey singh says self centered rapper dodged his calls made him sign blank papers