कौतुकास्पद..! महेश बाबूच्या ११ वर्षांच्या लेकीनं पहिली कमाई केली दान, होतंय सर्वत्र प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 08:47 IST2023-07-20T08:47:05+5:302023-07-20T08:47:24+5:30

Mahesh Babu's daughter Sitara : साऊथचा सुपरस्टार महेश बाबू नेहमीच प्रसिद्धीझोतात येत असतात, पण यावेळी त्यांची मुलगी सितारा चर्चेत आली आहे.

Admirable..! Mahesh Babu's 11-year-old daughter earns first donation, gets praise everywhere | कौतुकास्पद..! महेश बाबूच्या ११ वर्षांच्या लेकीनं पहिली कमाई केली दान, होतंय सर्वत्र प्रशंसा

कौतुकास्पद..! महेश बाबूच्या ११ वर्षांच्या लेकीनं पहिली कमाई केली दान, होतंय सर्वत्र प्रशंसा

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू नेहमीच प्रसिद्धीझोतात येत असतात, पण यावेळी त्यांची मुलगी सितारा चर्चेत आली आहे. खरेतर, अलीकडेच सिताराने एका ज्वेलरी ब्रँडसाठी जाहिरात शूट केली. या शूटचे फोटोही खूप व्हायरल होत होते. त्याचबरोबर या शूटच्या बदल्यात सिताराने आपला पहिला पगार चॅरिटीला दिला आहे. त्यानंतर सर्वजण त्यांच्या या कार्याचे कौतुक करत आहेत.

IANS च्या वृत्तानुसार, अभिनेता महेश बाबू आणि नम्रता यांची मुलगी सितारा घट्टामनेनीने सांगितले की, तिने जाहिरातीतून मिळालेली रक्कम चॅरिटीला दिली आहे. सितारा एका ज्वेलरी ब्रँडसाठी 'प्रिन्सेस' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये झळकली होती. या जाहिरातीसाठी तिने एक कोटी रुपये मानधन घेतले होते. सिताराने हे मानधन एका चॅरीटीला दान केले आहे. सिताराच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. सितारा घट्टमनेनी तिची आई नम्रता यांच्यासोबत हैदराबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्या नावाच्या कलेक्शनसाठी लुक बुक लॉन्च केले होते. त्याचवेळी टाइम स्क्वेअरवर त्यांचा संग्रहही दाखवण्यात आला. सितारा टाइम स्क्वेअरवर झळकणारी पहिली भारतीय स्टारकिड ठरली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता महेश बाबूची मुलगी सितारा ११ वर्षांची आहे. तिला पहिला पगार म्हणून एक कोटी रुपये मिळाले. ती आता पीएमजे ज्वेलर्सचा चेहरा बनली आहे. मीडियाशी बोलताना सिताराने सांगितले की, तिला अभिनयात खूप रस आहे. हा आत्मविश्वास तिला त्याच्या आईकडून मिळाला. सितारालाही चित्रपट पाहायला आवडतात.

Web Title: Admirable..! Mahesh Babu's 11-year-old daughter earns first donation, gets praise everywhere