​आदित्य - कॅटचे अळीमिळी गुपचिळी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 17:41 IST2016-08-16T12:11:12+5:302016-08-16T17:41:12+5:30

रणबीर कपूरशी झालेल्या ब्रेकअपनंतर कॅटरिना कैफ काही काळ सैरभैर झाली होती. पण आता ती सावरलीय आणि सावरायलाही हवी, कारण ...

Aditya - Katy's seductive nickname !! | ​आदित्य - कॅटचे अळीमिळी गुपचिळी!!

​आदित्य - कॅटचे अळीमिळी गुपचिळी!!

बीर कपूरशी झालेल्या ब्रेकअपनंतर कॅटरिना कैफ काही काळ सैरभैर झाली होती. पण आता ती सावरलीय आणि सावरायलाही हवी, कारण बातमीच तशी आहे. होय, कॅटरिनाच्या आयुष्यात पुन्हा एक नवी व्यक्ती आल्याची जोरदार चर्चा आहे. ही व्यक्ति म्हणजे आदित्य रॉय कपूर. कॅट व आदित्य यांच्यात लपतछपत प्रेम फुलत असल्याचे कळतेय. सध्या हे दोघेही ‘ड्रिम टीम टूर’च्या निमित्ताने अमेरिकेत आहेत. या अख्ख्या टूरमध्ये आदित्य व कॅट हळूहळू एकमेकांच्या प्रेमात अधिकाधिक गुंतत असल्याचेच दिसत आहे. या टूरमध्ये तालमीपासून तर मौजमस्तीपर्यंत अगदी प्रत्येक ठिकाणी आदित्य - कॅटरिना हे दोघेच सोबत दिसत आहेत.  खरे तर कॅट व आदित्यचे बॉन्डिंग तसे जुनेच म्हणायला हवे. अगदी कॅट रणबीरच्या प्रेमात होती तेव्हाही तिची आणि आदित्यची मैत्री कायम होती. ‘फितूर’च्या प्रमोशनवेळी कॅट रणबीरसोबतच्या ब्रेकअपमधून सावरण्याच्या प्रयत्नांत होती आणि या प्रयत्नांत आदित्य प्रत्येकवेळी तिच्यासोबत होता. गुडघ्यावर बसून कॅटला लाल गुलाब भेट देत असतानाचा आदित्यचा तो फोटो आपण कसे बरे विसरू शकू!! एकंदरच कॅट व आदित्य यांचे नाते आता मैत्रीपलिकडे गेल्याचे ऐकू येतेयं. तुम्हाला काय वाटतेयं??

Web Title: Aditya - Katy's seductive nickname !!