"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:52 IST2025-11-18T17:51:34+5:302025-11-18T17:52:26+5:30
दिग्दर्शक आदित्य धर यांनी ट्रेलर लाँचवेळी सर्व कलाकारांच्या मेहनतीचं कौतुक केलं.

"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाचा आज ट्रेलर प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांना या ट्रेलरची उत्सुकता होती. रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि अक्षय खन्ना अशा तगड्या कलाकारांचे अॅक्शन सीन्स, पॉवरफुल परफॉर्मन्स ट्रेलरमध्ये दिसले. ट्रेलरच असा आहे तर सिनेमा काय असेल याची कल्पनाच करणं शक्य नाही. दरम्यान दिग्दर्शक आदित्य धर यांनी ट्रेलर लाँचवेळी सर्व कलाकारांच्या मेहनतीचं कौतुक केलं.
'धुरंधर'चा ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबईत पार पडला. दिग्दर्शक आदित्य धरसह अर्जुन रामपाल, आर माधवन, सारा अर्जुन यांची हजेरी होती. यावेळी आदित्य म्हणाला, "मी हा सिनेमा सुरु केला त्याआधी जवळपास पाच वर्ष मी एकही सिनेमा केला नव्हता. कास्टिंग सुरु केली रणवीर सिंहची एन्ट्री झाली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जे धडपडत आहेत अशा लोकांवर आम्ही होल्ड ठेवला. सिनेमात एक डायलॉग आहे की 'घायल हूँ इसलिए घातक हूँ' आणि ते सगळेच घायल होते. सगळ्यांनी जे 'घातक'रित्या परफॉर्म केलं आहे ते अद्भूत आहे. प्रत्येकाने स्वत:ला अक्षरश: झोकून दिलं. असं नेहमीच घडत नाही."
तो पुढे म्हणाला, "कधी कधी काही लोक चांगले पैसे मिळतायेत बघून प्रोजेक्ट घेतात. कधी तो प्रोजेक्ट मोठा आहे म्हणून घेतात. पण या प्रोजेक्टच्या मागे स्पॉट दादापासून हेडपर्यंत सर्वांचाच एकच उद्देश होता की या प्रोजेक्टसाठी जीव पणाला लावायचा आहे. आम्ही दीड वर्ष सतत १६-१७ तास काम केलं. महत्वाचं म्हणजे खूप जास्त काम करावं लागतंय म्हणत एकानेही कोणी साधी तक्रार केली नाही. प्रत्येकाने १०० टक्के दिलं आहे."
एकीकडे दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्टच्या चर्चांदरम्यान आदित्य धरने हे वक्तव्य केल्याने चर्चेत आलं आहे. त्यातच त्याने दीपिकाचा नवरा रणवीर सिंहसमोर हे वक्तव्य केलं. 'धुरंधर' ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.