नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटात क्रिती सॅननच्या जागी दिसणार आदिती राव हैदरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:07 IST2017-10-04T10:29:41+5:302017-10-04T16:07:58+5:30
रंगून सारख्या बिग बजेट फिल्म बनवणारा दिग्दर्शक विशाल भारद्वाज सध्या कमी बजेटचा चित्रपट तयार करतो आहे. रंगून चित्रपट बॉक्स ...

नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटात क्रिती सॅननच्या जागी दिसणार आदिती राव हैदरी
र गून सारख्या बिग बजेट फिल्म बनवणारा दिग्दर्शक विशाल भारद्वाज सध्या कमी बजेटचा चित्रपट तयार करतो आहे. रंगून चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल म्हणूनच की काय विशाल कमी बजेटचा चित्रपट करतोय. रिपोर्टनुसार विशालच्या आगामी चित्रपटात नवाजुद्दीन सिद्धिकीबरोबर अदिती राव हैदरी दिसणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार आदिती रावने क्रिती सॅननची जागा घेतल्याचे समजते.
रिपोर्टनुसार, 'विशाल भारद्वाजला या चित्रपटात क्रिती सॅननला घ्यायचे होते पण काही कारणास्तव क्रिती हा चित्रपट करु शकत नाही आहे. त्यामुळे फिल्म मेकर्सनी क्रितीच्या ऐवजी अदिती राव हैदरीला घ्यायचा निर्णय घेतला. अदिती राव आधीपासूनच या चित्रपटाच्या मेकर्सशी बोलणी करत होती लवकरच ती हा चित्रपट साईन करणार आहे. पहिल्यांदाच आदिती राव हैदरी आणि नवाजुद्दीन सिद्धीकी एकत्र काम करत आहे.
नुकताच अदितीचा भूमी चित्रपट रिलीज झाला मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. यात अदितीने संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपट जरी चालला नसला तरी आदितीच्या अभिनयाचे कौतुक मात्र नक्कीच झाले.
तर दुसरीकडे नवाजुद्दीनचा बाबूमोशय बंदुकबाज आणि मुन्ना मायकल सारखे चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाले होते. दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. नवाज शाहरुख खानसोबत रईसमध्येसुद्धा झळकला होता. आता पाहू की आदिती आणि नवाजुद्दीनची जोडी प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडते. मात्र दोघांचे फॅन्स त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील. हा एक कॉमेडी चित्रपट असून लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. एका हिट चित्रपटाच्या शोधात आदिती राव हैदरी आणि विशाल भारव्दाज आहेत.
ALSO READ : बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईचे नाव; ट्विट करून व्यक्त केला आनंद!