अदितीवर कोसळला होता दुःखाचा डोंगर, बहिणीच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:35 IST2020-01-03T15:34:40+5:302020-01-03T15:35:14+5:30

अदिती गोवित्रीकर हिने बहिणीच्या वाढदिवसादिवशी भावूक होत सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Aditi Govitrikar shared emotional post for her sister | अदितीवर कोसळला होता दुःखाचा डोंगर, बहिणीच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली भावूक पोस्ट

अदितीवर कोसळला होता दुःखाचा डोंगर, बहिणीच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली भावूक पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री अदिती गोवित्रीकर एक अभिनेत्री, सुपर मॉडेल व सायकॉलॉजिस्ट आहे. ती मानसिक समस्यांविषयी समाजात जागरूकता करत असते. त्यासाठी तिने देशातल्या बऱ्याच शहरात व गावात जाऊन वर्कशॉप्स घेतले आहेत. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींना मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मदत केली आहे. 

काही दिवसांपूर्वी अदिती गोवित्रीकरच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तिचे वडील पनवेलमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेत होते. त्यावेळी अदितीने कुटुंबासोबत ठाम उभी होती.

वडीलांच्या निधनाला काही दिवस उलटले असून तिची बहिण आरझूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अदितीने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, ही वेळ आपल्यासाठी सोप्पी नाही. वडिलांना गमावले हे आपल्यासाठी खूप धक्कादायक होते. मला अभिमान वाटतो की अशा कठीण काळात तू खंबीर आधारस्तंभ बनून कुटुंबाला आधार दिला. एक सुंदर स्त्री जी आतूनही सुंदर आहे. आमच्या आधार स्तंभाला हार्दीक शुभेच्छा.


अदितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने पहेली व दे दना दन व बऱ्याच सिनेमातून रसिकांचे मन जिंकले आहे.

याशिवाय परछाई व ३७७ अॅबनॉर्मल या वेबसीरिजमध्येही ती झळकली आहे. या व्यतिरिक्त अदिती कुणाल कपूर व अमायरा दस्तूर यांच्यासोबत कोई जाने ना या चित्रपटात दिसणार आहे.

द ग्रे स्टोरीज या वेबसीरिजमध्ये ती किकू शारदा व हितेन तेजवानीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: Aditi Govitrikar shared emotional post for her sister