लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:09 IST2020-06-02T14:06:32+5:302020-06-02T14:09:40+5:30
२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये या अभिनेत्रीने घर काम करता- करता असे काही केले की, वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ
अदा शर्मानेहमीच सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूट करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. इतके नाही तर मध्यंतरी माकडांसोबतही गप्पा मारतानाच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ती माकडांसोबत इंग्रजीमध्ये बोलत होती. हे पाहून अनेकांना हसू आवरले नाही. म्हणून नेटीझन्सने तिला चांगलेच ट्रोल केले होते. इतकेच नाही तर यापूर्वीही तिने भींतीला लटकत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. विस्कटलेले केस, भिंतीवर लटकलेली अदाला पाहून अनेकांनी तिने असे का केले असावे असा प्रश्न निर्माण झाला होता.
आता आणखीन एक व्हिडीओमुळे अदाच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये ती घरकाम करण्यात बिझी आहे. घराची गच्चीची साफ सफाई करताना ती दिसते. यात तिचा देसी अंदाज पाहायला मिळतोय. चक्क साडी तिने परिधान केली आहे. गच्ची साफ करता -करता अदा अचानक स्टंट करू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच अनेकजण कौतुक करत लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत.
२००८ साली १९२० या सिनेमातून अदाने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती .