चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरलेली ही अभिनेत्री आहे आता अरबांची मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 12:22 IST2018-05-03T06:44:51+5:302018-05-03T12:22:44+5:30
चित्रपटांमध्ये अपयश मिळाल्यानंतरही दुसरा व्यवसाय करणारे आणि त्यातून बक्कळ पैसे कमवणारे अनेक सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात. काही अभिनेत्री लग्न ...

चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरलेली ही अभिनेत्री आहे आता अरबांची मालकीण
च त्रपटांमध्ये अपयश मिळाल्यानंतरही दुसरा व्यवसाय करणारे आणि त्यातून बक्कळ पैसे कमवणारे अनेक सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात. काही अभिनेत्री लग्न करून आपल्या पतीच्या व्यवसायला हातभार लावताना देखील दिसतात. संदाली सिन्हाने तुम बिन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या चित्रपटाची सगळीच गाणी प्रचंड गाजली होती. या गाण्याचे टायटल साँग तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात प्रियांशू चॅटर्जी, राकेश वशिष्ठ आणि संदाली सिन्हा यांच्या मुख्य भूमिका होत्या. संदाली सिन्हाने साकारलेली पियाची भूमिका तर प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटानंतर तिने पिंजर या चित्रपटात लज्जो ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ओम, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, तुम बिन २ यांसारख्या चित्रपटात झळकली. पण सैंदाली सिन्हाला बॉलिवूडमध्ये म्हणावे तितके यश मिळाले नाही. त्यामुळे तिने चित्रपटांपासून दूर राहाणेच पसंत केले.
संदाली सिन्हाने २००५ मध्ये किरण साळस्कर या उद्योगपतीशी लग्न केले. लग्नानंतर काही वर्षं ती चित्रपटांपासून दूरच राहिली होती. तिने सात-आठ वर्षांनंतर दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण तिथे देखील तिला अपयशच मिळाले. त्यामुळे ती सध्या तिच्या व्यवसायावरच लक्ष केंद्रित करत आहे. किरण साळस्कर यांचे अनेक रेस्टॉरंट आहेत. त्यांच्या फूड चेन जगभर पसरल्या आहेत. त्यामुळे संदाली पतीसमवेत व्यवसाय सांभाळत आहे. तिने काही वर्षांपूर्वी तिचे पती किरण यांच्यासोबत कंट्री ऑफ ओरिजिन ही बेकरी सुरू केली होती. ही बेकरी देशातील सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठ्या बेकरींमधील एक आहे. या बेकरीचा कारभार सैंदालीच पाहाते.
संदाली सिन्हा आणि किरण साळस्कर यांना तीन मुले असून सैंदालीचा जास्तीत जास्त वेळ हा मुलांसोबतच जातो. संदाली चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिने स्वतःला खूपच मेन्टेन ठेवले आहे.
![sandali sinha kiran salaskar]()