‘या’ अभिनेत्रीला हव्यात कंगनाकडून अ‍ॅक्टिंग टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:57 IST2016-12-08T17:57:27+5:302016-12-08T17:57:27+5:30

‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया सध्या खूप टेन्शनखाली वावरतेय. ठाऊक आहे का? नाही ना. कंगना राणौत हिच्या मुख्य भूमिकेतील ‘क्वीन’ ...

Actress wants action tips from Kangana! | ‘या’ अभिनेत्रीला हव्यात कंगनाकडून अ‍ॅक्टिंग टिप्स!

‘या’ अभिनेत्रीला हव्यात कंगनाकडून अ‍ॅक्टिंग टिप्स!

ाहुबली’ फेम तमन्ना भाटिया सध्या खूप टेन्शनखाली वावरतेय. ठाऊक आहे का? नाही ना. कंगना राणौत हिच्या मुख्य भूमिकेतील ‘क्वीन’ चित्रपटाचा तमिळ रिमेक लवकरच येणार आहे. या रिमेकमध्ये तमन्नाला कंगनाची भूमिका साकारायची आहे. कंगनासारखा तगडा अभिनय आपल्याला जमेल का? या विचारानेच तमन्नाचे टेन्शन वाढत चाललेय. कंगना राणौतला ‘क्वीन’ चित्रपटामुळेच उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘क्वीन’च्या रिमेकचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून कळतेय. त्यामुळे तमन्नाला म्हणे आता कंगनाकडून अभिनयाचे धडे गिरवायचे आहेत.

                          

‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ मधील अभिनयासाठी कंगना राणौतला ‘उत्कृष्ट अभिनेत्री’ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे समीक्षकांनीही कौतुक केले होते. तमन्ना म्हणते,‘मी कधीच कंगनाला भेटले नाही. मात्र, तिच्या अभिनयाने प्रचंड प्रभावित झाले आहे. मला तमिळ रिमेकमध्ये तिच्यासारखा अभिनय जमला पाहिजे. तिने मला अभिनयाच्या काही टिप्स द्याव्यात अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझा अभिनय सरस होण्यासाठी मला तिच्या मार्गदशनाची खरंच गरज आहे.’ तमिळ चित्रपट हा ‘क्वीन’चा पूर्णपणे कॉपी नसेल काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नक्कीच दिग्दर्शक करतील. 

                          

Web Title: Actress wants action tips from Kangana!