अँजिओप्लास्टीवेळी ऑपरेशन टेबलवर हसत होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, स्वत:च सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:50 PM2024-02-20T12:50:57+5:302024-02-20T12:51:35+5:30

अभिनेत्रीच्या हार्टअटॅकच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.

actress sushmita sen was laughing on operation table while doing angioplasty says her doctor was funny | अँजिओप्लास्टीवेळी ऑपरेशन टेबलवर हसत होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, स्वत:च सांगितला किस्सा

अँजिओप्लास्टीवेळी ऑपरेशन टेबलवर हसत होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, स्वत:च सांगितला किस्सा

गेल्या काही वर्षांपासून कमी वयात हृदयविकाराच्या धक्क्याने अनेक लोकांचा जीव जात आहे. अगदी चाळीशीतही हार्टअॅटॅकमुळे निधन होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाचा परिणाम आणि बदलती जीवनशैली यामुळे अशा घटना घडत आहेत. मनोरंजनविश्वातही असे अनेक कलाकार आहेत ज्यांचं खूप कमी वयात निधन झालं आहे तर काही जण मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेलाही केवळ ४३ व्या वर्षी हृदयविकाराचा धक्का आला. तर त्याआधी सुश्मिता सेनचीही (Sushmita Sen) अँजियोप्लास्टी करावी लागली. तेव्हा चाहतेही चकित झाले की इतके फिट असतानाही हे कसं झालं? 

सुश्मिता सेनने  नुकतंच तिच्या ऑपरेशनचा किस्सा सांगितला आहे. 'आर्या 3'मधून सुश्मिताने अभिनयाची ताकद दाखवली. दरम्यान या वेबसीरिजच्या शूटिंगवेळीच तिला हृदयविकाराचा धक्का आला होता. तसंच ती ऑटोइम्यून आजाराचाही सामना करत होती.  याविषयी बोलताना ती म्हणाली, "ऑटोइम्यून स्थितीचा सामना करताना मला खूप अडचणी आल्या. याचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे ब्रेन फॉग आहे. म्हणजे मी तुम्हाला जर विचारलं की तुझं नाव काय आहे? तर काही सेकंदाने मी परत तुम्हाला विचारते की तुझं नाव काय आहे? एक पब्लिक फिगर असताना माझ्यासाठी या समस्येचा सामना करणं खूप कठीण होतं. कारण मी अजिबातच जागरुक राहू शकत नव्हते."

हृदयविकारावर बोलताना सुश्मिता म्हणाली, "माझे आईवडील दोघंही हार्ट पेशंट आहेत. त्यामुळे मी माझ्या आरोग्याबद्दल नेहमीच जागरुक राहिले आहे. मला हृदयविकाराचा धक्का येण्याच्या सहा महिन्यांपूर्वी माझे सगळे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल होते.  मी आयुष्य हसतखेळत जगणारी व्यक्ती आहे. दिलखुलास आहे. माझ्या याच स्वभावाची मला खूप मदत झाली. ऑपरेशन टेबलवर असताना मी डॉक्टरसोबत जोक करत होते. हसत होते. माझे डॉक्टर खरंच खूप चांगले आणि मजेशीर स्वभावाचे होते. आम्ही फक्त अँजियोप्लास्टी होताना बघत होतो आणि आम्हाला खूप मजा आली."

सुश्मिताला सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर तिच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आणि एक स्टेंट घातला गेला.ट्रीटमेंटनंतर काही दिवसांनी सुश्मिताने ही बातमी सोशल मीडियावर सांगितली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

Web Title: actress sushmita sen was laughing on operation table while doing angioplasty says her doctor was funny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.