'गोल्ड डिगर म्हणून...'; ललित मोदीसोबत लग्न करणार होती सुश्मिता? अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 05:10 PM2023-11-19T17:10:55+5:302023-11-19T17:11:31+5:30

Sushmita sen: सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

actress-sushmita-sen-wanted-to-tie-knot-with-lalit-modi | 'गोल्ड डिगर म्हणून...'; ललित मोदीसोबत लग्न करणार होती सुश्मिता? अभिनेत्रीने केला खुलासा

'गोल्ड डिगर म्हणून...'; ललित मोदीसोबत लग्न करणार होती सुश्मिता? अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita sen) गेल्या काही काळापासून तिच्या करिअरसोबतच पर्सलन आयुष्यामुळेही चर्चेत येत आहे. रोहमन शॉ सोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत येणारी सुश्मिता गेल्यावर्षी उद्योजक ललित मोदी याच्यासोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आली होती.  या दोघांचा एक खासगी फोटो व्हायरल झाला होता ज्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. या चर्चांवर आता वर्षभरानंतर सुश्मिताने मौन सोडलं आहे.

सुश्मिता आणि ललित मोदी यांचा खासगी फोटो व्हायरल झाल्यानंतर या जोडीने लग्न केल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर ललित मोदींनी हा फोटो पोस्ट करत आम्ही रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. इतकंच नाही तर अनेकांनी तिला गोल्ड डिगर असंही म्हटलं होतं. या सगळ्यावर आता सुश्मिताने एका मुलाखतीमध्ये तिची प्रतिक्रिया दिली आहे.

ऐश्वर्याच्या सौंदर्यामुळे सुश्मिता सेनला भरली होती धडकी?; मिस इंडिया स्पर्धेचा फॉर्म घेतला होता मागे

"घडून गेलेली घटना ही माझ्या आयुष्यातला एक फेज होता. तेव्हा अनेक मीम्स पण व्हायरल झाले होते. ते मीम्स मला आवडले होते. पण, कोणाला गोल्ड डिगर म्हणून त्या माध्यमातून पैसे कमवू नका..सत्य नेमकं काय आहे याचा आधी शोध घ्या", असं सुश्मिता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला सोनं नाही तर हिरे आवडतात. त्यामुळे जर मला कोणासोबत लग्न करायचं असेल तर मी केव्हाच केलं असतं. त्यासाठी प्रयत्न केले नसते."  दरम्यान, सध्या सुश्मिताच्या तिच्या या वक्तव्यासह आर्या ३ मुळेही चर्चेत येत आहेत. या सीरिजचे २ पार्ट गाजल्यानंतर या तिसऱ्या पार्टलाही प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. त्यामुळे सध्या ओटीटीवर सुश्मिताचा बोलबाला आहे.
 

Web Title: actress-sushmita-sen-wanted-to-tie-knot-with-lalit-modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.