Sonakshi-Zheer: 'दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा लवकरच जहीरसोबतचं नातं करणार ऑफिशियल?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 17:54 IST2022-07-20T17:46:21+5:302022-07-20T17:54:36+5:30
सोनाक्षी ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण सोनाक्षी व जहीर अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत.

Sonakshi-Zheer: 'दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा लवकरच जहीरसोबतचं नातं करणार ऑफिशियल?, जाणून घ्या
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) गेल्या अनेक दिवसांपासून पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीच्या रिलेशनशिपची चर्चा जोरात सुरू आहेत. सोना ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) रिलेशनशिपमध्ये (Sonakshi Sinha Zaheer Iqbal affair) असल्याचं मानलं जातंय. दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आले आहे. पण सोनाक्षी व जहीर अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत.
एक मीडिया रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये सोनाक्षी आणि जहीर एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत आणि दोघांनी या म्युझिक व्हिडिओसाठी शूट केले आहे. या गाण्याद्वारे सोनाक्षी तिचे आणि जहीरचे नातं ऑफिशियल करून चाहत्यांना सुखद धक्का देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच आता सोनाक्षी आणि जहीरही लवकरच बॉलिवूडच्या पॉवर कपल्सच्या यादीत सामील होऊ शकतात.
लग्नाची बातमी झाली व्हायरल
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या बातम्या ही व्हायरल झाल्या आहेत. यापूर्वी, सोनाक्षीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती तिच्या हातात घातलेली अंगठी फ्लॉंट करताना दिसली होती. हे फोटो पाहून लोक असा अंदाज लावू लागले की सोनाक्षीचे एंगेजमेंट झाली आहे आणि आता ती लवकरच लग्न करणार आहे. पण यानंतर सोनाक्षीने एका पोस्ट शेअर करत सांगितले होते की, ते फोटोशूट एका जाहिरातीसाठी शूट करण्यात आले होते.
अशी सुरु झाली होती दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा
सोनाक्षीनं 2 जूनला आपला वाढदिवस साजरा केला. जहीरने सोनासाठी एक स्पेशल बर्थ डे पोस्ट शेअर केली होती. जहीरने सोनाचा एक व्हिडीओ शेअर केला. ‘हॅपी बर्थ डे सोना... आय लव्ह यू... तुला खूप सारं फूड, फाईट्स आणि लाफ्टर’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं. जहीरच्या या पोस्टला सोनाने सुद्धा रिप्लाय दिला होतो. ‘थँक यू... लव्ह यू आणि मी तुला मारायला येतेय...,’ असं तिने लिहिलं होतं.