अभिनेत्री सपना पब्बीला 'या' सिनेमामुळे पॉर्न स्टार नसल्याचा द्यावा लागला होता पुरावा?वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 15:57 IST2017-09-07T09:28:49+5:302017-09-07T15:57:00+5:30
बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या मादक अदा, बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असतात. कधी सिनेमातील लूक, तर कधी रॅम्पवर ...

अभिनेत्री सपना पब्बीला 'या' सिनेमामुळे पॉर्न स्टार नसल्याचा द्यावा लागला होता पुरावा?वाचा सविस्तर
ब लिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या मादक अदा, बोल्ड आणि सेक्सी अंदाजाने रसिकांची मनं जिंकत असतात. कधी सिनेमातील लूक, तर कधी रॅम्पवर आपले जलवे दाखवत अभिनेत्री आणि मॉडेल्स रसिकांची पसंती मिळवतात. फोटोशूटच्या माध्मातूनही अभिनेत्रींचा हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळतो. सध्या एका अभिनेत्रीच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत खामोशियाँ या सिनेमातून पाऊल ठेवणारी अभिनेत्री सपना पब्बी हिचा सेक्सी आणि ह़ॉट अंदाज समोर आला आहे. सपना पब्बीने एका मॅगझिनसाठी केलेले सेक्सी फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोशूटमध्ये सपना हिने काळ्या रंगाचा पारदर्शक (ट्रान्सपरन्ट) कपडे परिधान केले आहेत. वेगवेगळ्या बाजूंनी काढलेल्या या फोटोमधील सपनाच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सपनाने आपले हे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2015 साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या खामोशियाँ या सिनेमात सपनाने बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले होते. त्यामुळे तिला पॉर्न स्टार असंही संबोधण्यात येऊ लागलं. मात्र त्यावेळी सपनाने माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं. आपण पॉर्न स्टार नसल्याचे तिने सांगितले. सपना पब्बी हिचे हे काही पहिलेच फोटोशूट नाही. याआधीही विविध फोटोशूटच्या माध्यमांमधून सपनाने आपल्या मादक अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. आजवर फक्त एका सिनेमात झळकलेल्या सपनाने छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्येही काम केले आहे. आजा परदेशी, 24, 24-सीजन 2 अशा शोमध्ये सपना झळकली आहे.
![]()
ALSO READ:या अभिनेत्रीने बॅकलेस टॉपमध्ये केले हॉट फोटोशूट
ALSO READ:या अभिनेत्रीने बॅकलेस टॉपमध्ये केले हॉट फोटोशूट