अभिनेत्याच्या प्रेमात पडली, अन् क्रिकेटरसोबत लग्न केलं, मग घटस्फोट; प्रेमात अपयशी ठरली बॉलिवूडची ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:49 AM2023-05-26T09:49:46+5:302023-05-26T09:53:28+5:30

फिल्मी करिअर फार काही चालले नाही. चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याचीच चर्चा जास्त झाली. अभिनेत्री दोनदा प्रेमात पडली.

Actress sangeeta bijlani love life affair with salman khan marriage with mohammad azharuddin unknown facts | अभिनेत्याच्या प्रेमात पडली, अन् क्रिकेटरसोबत लग्न केलं, मग घटस्फोट; प्रेमात अपयशी ठरली बॉलिवूडची ही अभिनेत्री

अभिनेत्याच्या प्रेमात पडली, अन् क्रिकेटरसोबत लग्न केलं, मग घटस्फोट; प्रेमात अपयशी ठरली बॉलिवूडची ही अभिनेत्री

googlenewsNext

९०च्या दशकातील बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची ‘बिजली’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) 1980 साली संगीतानं मिस इंडियाचा किताब पटकावला आणि त्यानंतर 8 वर्षांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. पण फिल्मी करिअर फार काही चालले नाही. चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याचीच चर्चा जास्त झाली. अभिनेत्री दोनदा प्रेमात पडली. अभिनेत्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने क्रिकेटरसोबत लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला संगीताच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत. 

अशी झाली मोहम्मद अजहरूद्दीनची एंट्री
त्रिदेव या सुपरहिट चित्रपटातील ओये-ओये या गाण्यानं मनं जिंकणारी संगीता बिजलानी एकेकाळी सलमान खानची आकंठ बुडाली होती. दोघांच्या लग्नाची चर्चाही रंगली होती. पत्रिकाही छापून तयार होत्या, लग्नापर्यंत पोहोचलेलं हे नातं अचानक संपलं आणि एकाकी पडलेल्या संगीताच्या आयुष्यात एका नव्या पुरूषाची एन्ट्री झाली. तो होता क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन. 

एका जाहिरातीचं शूट होतं. याच ठिकाणी अजहर व संगीता पहिल्यांदा भेटले होते. ही पहिलीच भेट अजहरसाठी पुरे होती. कारण या पहिल्याच भेटीत अजहर संगीताच्या सौंदर्यावर भाळला होता. अजहर विवाहित होता. पण पहिल्याच नजरेत संगीताच्या प्रेमात पडला होता. मग भेटीगाठी वाढत गेल्या आणि संगीता व अजहर एकमेकांत हरवले. इतके की, दोघांनाही दुरावा सहन होईना. पण लग्न करायचं तर अजहरला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेणं भाग होतं. अखेर त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्यानं पत्नी नौरीनंला सगळं काही सांगितलं. अजहरला रोखून फायदा नव्हताचं, नौरीनं तयार झाली. तिनं पतीला लग्नाच्या बंधनातून मुक्त केलं आणि 1996 रोजी अजहर संगीताचा झाला.

सुरूवातीचे दिवस आनंदात गेले. पण काळासोबत नातं पुढं जात असताना या नात्याला दृष्ट लागली. होय, दृष्ट. लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांतही खटके उडू लागले. मीडिया रिपोर्टनुसार, अजहर व बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांची वाढती जवळीक संगीताला असह्य झाली होती. याचमुळं दोघांचा संसार मोडला, असं मानलं जातं. संगीतानं अजहरशी घटस्फोट घेतला. त्याच्यानंतर संगीता दुसऱ्या  लग्नाच्या भानगडीत पडली नाही. पण हो, सलमान सोबतची मैत्री तिनं जपली. आजही ती कायम आहे.

Web Title: Actress sangeeta bijlani love life affair with salman khan marriage with mohammad azharuddin unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.