अभिनेत्रीला मिळत नव्हते काम, अखेर सलमानने केली मदत, आता झळकणार बड्या बॅनरच्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:19 IST2020-12-29T19:15:33+5:302020-12-29T19:19:40+5:30

'कागज' या सिनेमात संदिपा झळकणार आहे.बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे तिला हे काम मिळाले म्हणून तिने त्याचे आभारही मानले आहेत.

Actress Sandeepa Dhar was not getting Work, Finally Salman helped her, now she will be seen in a big banner movie Kaagaz | अभिनेत्रीला मिळत नव्हते काम, अखेर सलमानने केली मदत, आता झळकणार बड्या बॅनरच्या सिनेमात

अभिनेत्रीला मिळत नव्हते काम, अखेर सलमानने केली मदत, आता झळकणार बड्या बॅनरच्या सिनेमात

बॉलीवुडचा दबंग सलमान खान  सध्या अभिनेत्री संदिपा धारवर भलताच फिदा आहे.सलमान हिंदी चित्रपटसृष्टीत गॉडफादर म्हणूनही ओळखला जातो. अनेक नवोदित अभिनेत्रींना त्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकण्याची पहिलीवहिली संधी मिळवून दिली. सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, स्नेहा उल्लाल, झरीन खान अशी किती तरी नावं यांत घेता येतील.

 

याच यादीत आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाची भर पडणार आहे. अभिनेत्री संदिपा धारला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हते. अखेर सलमानच्या मदतीने संदिपा धारला बड्या बॅनरच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे.

 'कागज' या सिनेमात संदिपा झळकणार आहे.बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे तिला हे काम मिळाले म्हणून तिने त्याचे आभारही मानले आहेत.सलमानने पहिल्यांदाच संदिपाची मदत केली असे नाही तर यापूर्वीही 'दबंग २' या सिनेमातील एका आयटम साँगसाठी माझी निवड केली होती.

 

त्यामुळे दुस-यांदा सलमानने मला काम मिळवून दिल्याचे संदिपाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.संदिपाला थेट सलमानची साथ मिळत असल्यामुळे तिचं हिंदी चित्रपटसृष्टीतील भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटल्यास वावगं ठरु नये. 

हिट सिनेमा देऊनही सलमान खानला मिळत नव्हतं काम, वडिलांना करावी लागली होती शिफारस

सलमानने 'बिवी हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या सिनेमात रेखा, फारूक शेख, कादर खान, बिंदू आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. सिनेमा हिट ठरला असला तरी या सिनेमातील सलमानच्या भूमिकेचे कौतुक झाले नव्हते. काही महिन्यांनंतर त्याला 'मैंने प्यार किया' या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

सलमानचा 'मैंने प्यार किया' हा सिनेमा सुपरहिट झाला होता. हा सिनेमा सुपरहिट होवूनही सलमानला इतर सिनेमाच्या ऑफर येत नव्हत्या. अखेर त्याचे वडील सलीम खान यांनी त्याची मार्केट व्हॅल्यू वाढवण्यासाठी जी.पी. सिप्पी यांना सलमानला घेऊन ते सिनेमा करत असल्याची घोषणा करायला सांगितले होते.

सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉटेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सलमान लोकांच्या हृदयावर राज्य करतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमानची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. बिग बॉस कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन देखील त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.

Web Title: Actress Sandeepa Dhar was not getting Work, Finally Salman helped her, now she will be seen in a big banner movie Kaagaz