रेखा यांच्यापेक्षा त्यांची बहिण राधा आहेत जास्त सुंदर, एकेकाळी राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटाची नाकारली होती ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 16:33 IST2022-07-30T16:32:55+5:302022-07-30T16:33:29+5:30

Rekha: रेखा यांची बहीण राधा यांनी त्यांच्या काळात काही साउथ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्या काळात त्यांनी अनेक मोठ्या मासिकांसाठी मॉडेलिंग केले आणि काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Actress Rekha's sister Radha is so beautiful, who once rejected Raj Kapoor's 'Bobby' offer. | रेखा यांच्यापेक्षा त्यांची बहिण राधा आहेत जास्त सुंदर, एकेकाळी राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटाची नाकारली होती ऑफर

रेखा यांच्यापेक्षा त्यांची बहिण राधा आहेत जास्त सुंदर, एकेकाळी राज कपूर यांच्या 'बॉबी' चित्रपटाची नाकारली होती ऑफर

रेखा (Rekha) बॉलिवूडमधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच त्या राज्यसभेच्या खासदारही राहिल्या आहेत. रेखा बॉलिवूडमधील त्यांच्या कामामुळे चर्चेत राहिल्या आहेत, तर त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. त्यांचे आई-वडील दक्षिणेकडील चित्रपटांतील प्रसिद्ध कलाकार होते आणि त्यांचे जीवन बरेच वादग्रस्त होते. आई-वडिलांच्या वाईट नात्याचा परिणाम त्यांच्या बालपणावर आणि आयुष्यावर कुठेतरी दिसत होता. रेखा यांची आई पुष्पवल्ली यांनी रेखा आणि राधा या दोन मुलींना जन्म दिला.

रिपोर्ट्सनुसार, रेखा यांची बहीण राधा यांनी त्यांच्या काळात काही साउथ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्या काळात त्यांनी अनेक मोठ्या मासिकांसाठी मॉडेलिंग केले आणि काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केले होते. जरी त्यांना चित्रपटांपेक्षा मॉडेलिंगमध्ये जास्त रस होता. त्या काळातील त्यांचे फोटो पाहून चित्रपट निर्माते राज कपूर यांनी त्यांना बॉबी चित्रपटाची ऑफर दिली, पण राधा यांनी नकार दिला.


राधा यांनी नकार दिल्यानंतर या चित्रपटासाठी डिंपल कपाडियाची निवड झाली आणि त्या या चित्रपटातून स्टार झाली. त्याचवेळी राधा यांनी १९८१ मध्ये त्यांचा बालपणीचा मित्र उस्मान सईदशी लग्न केले आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. उस्मान दक्षिणेचे दिग्दर्शक एस.एम. अब्बास यांचा मुलगा आहे. या लग्नासाठी राधा यांनी त्यांचे नाव बदलून राबिया ठेवले. राधा यांना नाविद आणि अमन अशी दोन मुले आहेत. दोघेही तिथेच स्थायिक झाले आहेत.


राधा त्यांच्या कुटुंबीयांना आणि बहिणींना भेटण्यासाठी भारतात येत असतात. काही वर्षांपूर्वी त्या प्रकाशझोतात आल्या होत्या जेव्हा त्या त्यांची बहीण रेखासोबत अरमान जैनच्या लग्नाच्या रिसेप्शनला आल्या होत्या. दोन्ही बहिणींनी फोटोसाठी एकत्र पोज दिली होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Web Title: Actress Rekha's sister Radha is so beautiful, who once rejected Raj Kapoor's 'Bobby' offer.

टॅग्स :Rekhaरेखा