अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री रेखा म्हणाल्या, 'आम्ही दोघे....'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:14 IST2022-02-10T17:14:28+5:302022-02-10T17:14:55+5:30

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कधीच रेखा (Rekha) यांच्यासोबतच्या नात्याबद्दल काहीच वक्तव्य केले नाही.

Actress Rekha said about her relationship with actor Amitabh Bachchan, 'We both ....' | अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री रेखा म्हणाल्या, 'आम्ही दोघे....'

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री रेखा म्हणाल्या, 'आम्ही दोघे....'

बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे. एकेकाळी या दोघांचं रिलेशनशीप खूप चर्चेत आले होते. मात्र अमिताभ बच्चन आणि जया बच्चन विवाहबंधनात अडकले आणि रेखा आणि बिग बींच्या नात्याला पूर्णविराम लागला. अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल काहीच वक्तव्य केले नाही. त्यांना कधीही रेखा यांच्या सोबतच्या नात्याबद्दल विचारले की, ते चुप्पी साधायचे. पण रेखा मात्र आपल्या प्रेमाबद्दल जाहीरपणे बोलत असत. त्यांनी कधी डायरेक्ट तर कधी इनडायरेक्ट अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली.

रेखा यांनी १९८४ साली दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा यांनी या मुलाखतीत अमिताभ आणि त्यांच्यासोबत त्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, 'त्यांच्या प्रतिमेसाठी आणि मुलांसाठी त्यांनी कधीही लोकांसमोर हे नाते स्वीकारले नाही. लोक काय विचार करतात, यामुळे त्यांना फरक पडत नाही.' याशिवाय रेखा यांनी पुढे सांगितले की, 'लोकांना माझ्याबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल आणखी काय कळायला हवंय? आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो हे पुरेसं नाही का?'


रेखा यांनी या मुलाखतीत सांगितले की, लोकांनी मला गरीब, वेडे म्हटले असेल. परंतु अमिताभ बच्चन यांचे १० लोकांशी संबंध नव्हते. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. ते कोणाचे मन दुखावू शकत नाही. मग सगळ्यांसमोर काही बोलून ते त्यांच्या बायकोला कसे दुखावणार?'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि रेखा 'गंगा की सौगंध' या सिनेमात एकत्र काम करत असताना सेटवर एका सहकलाकाराने रेखा यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. त्यावेळी त्याच्यावर बिग बी चांगलेच संतापले होते. या घटनेनंतर या दोघांच्या प्रेमाची कल्पना सर्वांना आली होती.

Web Title: Actress Rekha said about her relationship with actor Amitabh Bachchan, 'We both ....'