गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री रेखा मुंबईत राहते या व्यक्तीसोबत, कोणाच्या नावाचं लावलं सिंदूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 11:54 IST2025-10-10T11:52:32+5:302025-10-10T11:54:00+5:30
Actress Rekha : बॉलिवूडच्या लिजेंड अभिनेत्री रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच जास्त चर्चेचा विषय राहिला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री रेखा मुंबईत राहते या व्यक्तीसोबत, कोणाच्या नावाचं लावलं सिंदूर?
बॉलिवूडच्या लिजेंड अभिनेत्री रेखा (Actress Rekha) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच जास्त चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्याबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीने वयाच्या १६व्या वर्षीच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. आज त्या ७१ वर्षांच्या झाल्या असून, तरीही एकट्या राहत आहेत. विशेष म्हणजे, १० ऑक्टोबरला रेखा आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने, त्या मुंबईत कोणासोबत राहतात, त्यांनी किती लग्न केले आहेत आणि त्या कोणाच्या नावाचे सिंदूर लावतात, याबद्दल जाणून घेऊया.
रेखा बांद्रा येथील बँडस्टँड येथील त्यांच्या आलिशान बंगल्यात राहतात. या बंगल्याला त्यांनी 'बसेरा' असे नाव दिले आहे. त्यांच्या या घराची किंमत १०० कोटी रुपये असून, त्याच्या डिझाइन आणि रॉयल लूकमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. रिपोर्ट्सनुसार, रेखाच्या या घरात फक्त त्यांचे अतिशय जवळचे लोक प्रवेश करू शकतात. बाकीच्या लोकांसाठी हे ठिकाण एक रहस्यमय जागाच आहे.
रिपोर्टनुसार, रेखा त्यांच्या बंगल्यात त्यांची सेक्रेटरी फरजाना यांच्यासोबत राहतात. फरजाना या एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांना अभिनेत्रीच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी आहे. रेखा यांच्या घरातील नोकरदेखील त्यांच्या बेडरूममध्ये जाऊ शकत नाहीत. फरजानाच रेखाच्या संपूर्ण घराची आणि सर्व कामांची काळजी घेतात आणि नियंत्रण ठेवतात. इतकेच नाही तर रेखा जिथे जिथे जातात, तिथे त्यांची सेक्रेटरी फरजाना त्यांच्यासोबत सावलीसारखी हजर असते.
रेखा यांनी किती लग्न केले?
रेखा यांच्या लग्नाबद्दल बोलायचे झाल्यास अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी दोन विवाह केले आहेत. असे म्हटले जाते की, अभिनेत्रीने पहिले लग्न बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा यांच्यासोबत केले होते. मात्र, अभिनेत्याच्या आईला हे नाते अजिबात पसंत नव्हते. यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या रेखा यांच्या 'द अनटोल्ड स्टोरी' या चरित्रात याचा उल्लेख आहे की, विनोद मेहरा आणि रेखा यांनी कोलकातामध्ये लग्न केले होते. लग्नानंतर अभिनेता जेव्हा रेखा यांना घरी घेऊन गेले, तेव्हा त्यांची आई चिडली होती. रेखा जेव्हा त्यांच्या सासूबाईंच्या पायांना स्पर्श करायला गेल्या, तेव्हा त्यांनी अभिनेत्रीला धक्का दिला होता.
दुसऱ्या पतीने केली होती आत्महत्या
त्यानंतर विनोद मेहरा यांनी रेखाला घरातून जायला सांगितले होते, असे म्हटले जाते. रेखा यांनी दुसरा विवाह दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत १९९० मध्ये केला होता. मुकेश हे हॉटलाइन किचनवेअर ब्रँडचे मालक होते. मात्र, हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांच्या आतच त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती. पतीच्या आत्महत्येनंतर रेखा यांना 'नॅशनल व्हँप' असा टॅग मिळाला होता.
रेखा सिंदूर का लावतात?
रेखा नेहमीच त्यांच्या लूक्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असतात. कारण, अभिनेत्री अनेकदा सिंदूर लावून आपला लूक पूर्ण करतात. त्यामुळे, जेव्हा रेखा एकट्या आहेत, तेव्हा त्या कोणाच्या नावाचे सिंदूर लावतात, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. याबद्दल अनेकवेळा रेखा यांनी स्पष्ट केले आहे की, सिंदूर त्यांच्यासाठी 'फॅशन स्टेटमेंट' आहे आणि तो त्यांच्या लूकला पूर्ण करतो. अभिनेत्रीने सांगितले आहे की, त्या ज्या शहरातून येतात, तिथे सिंदूर लावणे एक फॅशन आहे. रेखा यांनी हे देखील म्हटले आहे की, त्यांच्यावर सिंदूर चांगला दिसतो आणि तो त्यांच्या मेकअपला जुळतो.