रवीनाची लेक करतीये मलायकाच्या मुलाला डेट?; अभिनेत्रीने दिला राशाला सल्ला, म्हणाली, 'लग्न म्हणजे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:21 PM2024-04-25T12:21:04+5:302024-04-25T12:21:30+5:30

Raveena tandon: राशा अभिनेता अरबाज खानचा लेक अरहान खानला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यावर रवीनाने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

actress-raveena-tandon-has-made-a-big-statement-about-her-daughter-rasha-thadani | रवीनाची लेक करतीये मलायकाच्या मुलाला डेट?; अभिनेत्रीने दिला राशाला सल्ला, म्हणाली, 'लग्न म्हणजे...'

रवीनाची लेक करतीये मलायकाच्या मुलाला डेट?; अभिनेत्रीने दिला राशाला सल्ला, म्हणाली, 'लग्न म्हणजे...'

गेल्या काही काळात बॉलिवूडमध्ये स्टार्सकिडसची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक स्टारकिड्सने इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. तर, काही जण लॉन्च होण्यापूर्वीच चर्चेत येत आहेत. यात सध्या अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिची लेक राशा थडानी (Rasha Thadani)  हिची चर्चा रंगली आहे. राशा केवळ १९ वर्षांची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या राशा अभिनेता अरबाज खानचा लेक अरहान खान याच्यामुळे चर्चेत येत आहे. राशा आणि अरहान एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यावर रवीनाने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच रवीनाने 'फिल्मीज्ञान' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लेकीला लव्हलाइफविषयी एक सल्ला दिला. "सध्या तरी तिने तिच्या करिअरवर, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. मी सगळ्यांना एकच सांगते तेच राशाला सांगेन. रिलेशनशीपमध्ये पडायची घाई करु नका. अनेक मुली विचार करतात मी लग्नात असा आऊटफिट घालेन, मेहंदी लावेन. पण, लग्न म्हणजे एक मोठी कमिटमेंट आहे. त्यामुळे नीट विचार करा की, आपल्यासाठी हा योग्य नवरा आहे का? त्याच्यासोबत आपण आपलं सगळं आयुष्य घालवू शकतो का? आणि मगच निर्णय घ्या", असं रवीना म्हणाली.

दरम्यान, रवीना आणि राशा या दोघी जरी मायलेकी असल्या तरी त्यांचं मैत्रीचं नातं आहे. बऱ्याचदा या दोघींना एकत्र स्पॉट केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून राशा अरहानला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याविषयी या दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे.

Web Title: actress-raveena-tandon-has-made-a-big-statement-about-her-daughter-rasha-thadani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.