आईला अग्निसंस्कार नको होते अन् ती अचानक गायब झाली! अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:05 IST2025-08-21T13:01:56+5:302025-08-21T13:05:42+5:30

शरीर स्मशानात जाळण्यास अभिनेत्रीचा नकार, मृत्यूपूर्वीच गायब झाली अन...; पूजा बेदीचा आईबद्दल मोठा खुलासा

actress pooja bedi reveals about her mother protima bedi death says her body was not found | आईला अग्निसंस्कार नको होते अन् ती अचानक गायब झाली! अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

आईला अग्निसंस्कार नको होते अन् ती अचानक गायब झाली! अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

Pooja Bedi: बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी हे त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहेत. कबीर बेदी यांची ४ लग्न झाली आहेत. त्यांची पहिली पत्नी प्रसिद्ध डान्सर,मॉडेल प्रतिमा बेदी होत्या. अवघ्या सात वर्षानंतर त्यांच्या नात्यात कटूता आली. त्यांना पूजा बेदी आणि सिद्धार्थ बेदी ही दोन मुले आहेत. अलिकडेच त्यांची मुलगी अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या आईच्या आयुष्याशी, तिच्या मुक्त विचारसरणीच्या स्वभावाशी आणि तिच्या गूढ मृत्यूशी संबंधित भावनिक गोष्टी शेअर केल्या.

अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत पूजा बेदीने तिच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, माझी आईसोबतची पहिली आठवण म्हणजे ती आम्हाला जुहू बीचवर वाळूवर एबीसीडी लिहायला शिकवायची. शिवाय ती आम्हाला सतत मिठी मारायची आमचे चुंबन घ्यायची. ती एकदम मनमोकळेपणाने जगायची. आई तिचं आयुष्य अगदी भरभरुन जगली. सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे जर आपण कधी गृहपाठ घरी आणून करायला सुरुवात केली तर ती आमच्यावर रागावायची आणि म्हणायची, मी तुम्हाला शाळेत जाताना घरचं काम देत नाही, मग ते तुम्हाला घरी करायला शाळेचं काम कसं देतात.हा तुमचा आणि माझा वेळ आहे, तुम्ही गृहपाठ करु नका. असं ती आम्हाला सांगायची.

शेवटच्या दिवसांमध्ये कुलू मनालीला गेली अन्...

१९९८ मध्ये प्रतिमा बेदी यांचा कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान त्यांचा मृ्त्यू झाला. पुढे आपल्या आईविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, मला तिच्यासोबत खूप एकत्र घालवायचा होता, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. ती एक अशी स्त्री होती जी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायची.या सुंदर, अद्भुत जीवनाच्या शेवटी, तिला अशा स्मशानात जाळण्यात येऊ नये, तसंच तिच्या अस्थीचं गंगेत विसर्जन करु नये. असं तिला वाटत होतं. तिला निसर्गासोबत एकरुप व्हायचं होतं आणि तेच घडलं. तिचा मृतदेह कधीच सापडला नाही.ती या ब्रम्हांडाशी, भूमीशी एकरूप झाली." असा खुलासा अभिनेत्रीने केला.

Web Title: actress pooja bedi reveals about her mother protima bedi death says her body was not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.