प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं आहे मोहम्मद शमीबरोबर लग्न, थेट सोशल मीडियावरच केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 17:50 IST2023-11-08T17:49:48+5:302023-11-08T17:50:48+5:30

"...तर मी शमीबरोबर लग्न करेन", प्रसिद्ध अभिनेत्रीने क्रिकेटरला घातली लग्नाची मागणी, ठेवली 'ही' अट

actress payal ghosh marriage proposal to indian cricketer mohammad shami tweet viral | प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं आहे मोहम्मद शमीबरोबर लग्न, थेट सोशल मीडियावरच केलं प्रपोज

प्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं आहे मोहम्मद शमीबरोबर लग्न, थेट सोशल मीडियावरच केलं प्रपोज

मोहम्मद शमी हा भारताचा स्टार क्रिकेटर आहे. वर्ल्डकपमध्येही शमी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. उत्तम गोलंदाजीने त्रिफळा उडवणाऱ्या शमीसमोर भल्याभल्या फलंदाजाचाही थरकाप उडतो. क्रिकेटचं मैदान गाजवणारा शमी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. पण, सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शमीला एका प्रसिद्ध अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरच प्रपोज केलं आहे. 

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी पायल घोषने ट्वीटरवरुन मोहम्मद शमीला थेट लग्नाची मागणीच घातली आहे. शमीबरोबर लग्न करण्यासाठी तयार असल्याचं पायलने म्हटलं आहे. तिने शमीपुढे लग्नासाठी एक अटही ठेवलं आहे. "शमी तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याबरोबर लग्नासाठी तयार आहे", असं ट्वीट पायलने केलं आहे. २ नोव्हेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान हे ट्वीट पायलने केलं होतं. या मॅचमध्ये शमीने शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर पायलने पुन्हा एक ट्वीट केलं होतं. 

"मोहम्मद शमी सेमी फायनलमध्ये सर्वश्रेष्ठ योगदा देण्यासाठी तुला माझ्याकडून कोणत्या प्रकारच्या नैतिक समर्थनाची गरज आहे? आपल्याला आधी फायनलमध्ये जागा बनवावी लागेल. तुम्ही हिरो बनावं अशी माझी इच्छा आहे," असं दुसरं ट्वीटही पायलने केलं होतं. पण, हे ट्वीट तिने थोड्यावेळाने डिलीट केलं. तिचं हे ट्वीटही व्हायरल झालं होतं. 

कोण आहे पायल घोष

पायल घोष ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, कन्नड आणि तेलुगु चित्रपटांत काम केलं आहे. पायल तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. पायल राजकारणातही सक्रिय आहे. तिने रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीत प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. 

Web Title: actress payal ghosh marriage proposal to indian cricketer mohammad shami tweet viral