मलायका, कतरीना नाही तर ही आहे बॉलिवूडची नवी ‘आयटम सॉन्ग क्वीन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 14:53 IST2019-12-26T14:51:48+5:302019-12-26T14:53:19+5:30
आजही आयटम सॉन्गची मागणी आहेच आणि या आयटम नंबर्सला एका अभिनेत्रीने एक वेगळी ओळख दिली आहे.

मलायका, कतरीना नाही तर ही आहे बॉलिवूडची नवी ‘आयटम सॉन्ग क्वीन’
गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे. स्क्रिप्ट निवडताना कलाकार आणखी चोखंदळ झाले आहेत. बजेटपेक्षा कंटेटवर अधिक भर दिला जात आहे. प्रमोशनचे फंडे बदलले आहेत. पण एक गोष्ट मात्र कायम आहे, ती म्हणजे आयटम सॉन्ग. होय, आजही आयटम सॉन्गची मागणी आहेच आणि या आयटम नंबर्सला एका अभिनेत्रीने एक वेगळी ओळख दिली आहे. तिचे नाव काय, तर नोरा फतेही. अलीकडच्या अनेक आयटम सॉन्गमध्ये नोरा झळकली आहे.
आता तर कॅनडाची ही डान्सर, मॉडेल, अॅक्ट्रेस व सिंगर बॉलिवूडची नवी ‘आयटम सॉन्गची क्वीन’ म्हणून ओळखली जातेय. कॅनडात वाढलेल्या पण मनाने भारतीय असलेल्या नोराने सुरुवातीच्या काळात तेलगू चित्रपटांमध्ये आयटम नंबर्स केलेत. बाहुबली, टेंपर, किक 2 अशा अनेक सिनेमात तिने आयटम नंबर्स केलेत.
2015 मध्ये तिने ‘बिग बॉस 9’मध्ये एन्ट्री केली आणि 84 व्या दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर बाहेर पडली. 2016 मध्ये तिने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमातील ‘दिलबर’ या गाण्याने नोरा थिरकताना दिसली आणि या गाण्याने जणू तिचे नशीब बदलले. रिक्रिएट करण्यात आलेल्या या गाण्याला पहिल्या दिवशी 20 मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले होते. भारतील गाण्याच्या इतिहासात हा एक रेकॉर्ड होता. यानंतर नोराने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि ती अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी झाली.
लवकरच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सिनेमात ती श्रद्धा कपूर, वरूण धवन, प्रभुदेवा यांना टक्कर देताना दिसणार आहे. नोराही बॉलिवूडची पहिली अभिनेत्री आहे, जिने डान्सर म्हणून ओळख मिळवली आणि आता ती अॅक्टिंगमध्ये जम बसवतेय.