'शरीरसंबंधांची मागणी केली....' नीना गुप्ता यांनी केला कास्टिंग काऊचबाबत खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:24 PM2022-10-19T17:24:59+5:302022-10-19T18:47:00+5:30

अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) यांनाही त्यांच्या करिअरमध्ये या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला होता

Actress Neena Gupta made a sensational revelation about the casting couch | 'शरीरसंबंधांची मागणी केली....' नीना गुप्ता यांनी केला कास्टिंग काऊचबाबत खळबळजनक खुलासा

'शरीरसंबंधांची मागणी केली....' नीना गुप्ता यांनी केला कास्टिंग काऊचबाबत खळबळजनक खुलासा

googlenewsNext

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री अनेकदा कास्टिंग काऊचवर बोलताना दिसतात. कास्चिंग काऊच म्हणजे चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात अभिनेत्रींकडे शरीरसंबंधांची मागणी करणं. अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta)  यांनाही त्यांच्या करिअरमध्ये या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला होता. सध्या नीना गुप्ता त्यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासात त्यांनाही कास्टिंग काऊचचा अनेकदा सामना कारावा लागला आहे.

नीना गुप्ता यांनी त्यांचं आत्मचरित्र ‘सच कहूं तो’(Sach Kahun Toh: An Autobiography)कास्टिंग काऊचचा त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितलं आहे. त्या लिहितात,  'होय कास्टिंग काऊच आहे. अनेकदा तुमच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली जाते. पण हे सर्व तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. माझ्या अनुभवांवरून मी सांगू शकते की जर तुम्ही असं काही केलं तरी याची काहीच खात्री नाही की त्यानंतर तुम्हाला चांगली भूमिका मिळेल. कारण हा एक व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये  जे विकलं जातं तेच घ्यावं लागतं.”

कास्टिंग काउचचा उल्लेख करताना नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दोन किस्से सांगितल्या आहेत. त्याचा 'खानदान' हा चित्रपट हिट ठरला, मात्र या चित्रपटानंतर त्याला नकारात्मक भूमिकेच्या खूप ऑफर्स येऊ लागल्या. नीना  यांना चांगल्या भूमिकाच्या शोधात असताना त्यांची भेट एका दाक्षिणात्य निर्मात्याशी झाली होती. त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना या निर्मात्याचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी नीना नाटकात काम करत होत्या. नाटकाचा शो संपल्यानंतर नीना त्या निर्मात्याला भेटण्यासाठी हॉटेलवर गेल्या तेव्हा त्यांने नीना यांना त्याच्या रुममध्ये बोलावलं.


नीना लिहितात, 'एकदा माझ्या मनात आलं की जाऊ नयं किंला त्यांना खाली यायला सांगाव. पण त्यांना वाईट वाटलं तर मग मी लिफ्टमधून वर गेलो. मी दार वाजवलं. पलंग आणि खुर्ची असलेली ती एकच खोली होती. ते खुर्चीवर बसले होते आणि मी बेडच्या कोपऱ्यावर बसलं. चित्रपटाशी संबंधीत आमच्या गप्पा सुरु झाल्या. मग मी त्यांना विचारलं, 'सर, या चित्रपटात माझी भूमिका काय असेल? तर ते म्हणाला, 'अभिनेत्रीच्या मैत्रिणीची भूमिका.ही फक्त एक छोटी भूमिका होती. मी गप्प बसले मग म्हणालो, 'ठीक आहे सर मला जायचे आहे'. हे ऐकून ते म्हणाला, 'कुठे जायचं आहे? तू इथे रात्रभर थांबणार होतीस. माझे पाय थरथरायला लागले. मी घाबरले होते. मला काय बोलावं कळतं नव्हते. . मी उठलो आणि निघाले.

यानंतर नीनाने कास्टिंग काउचच्या दुसऱ्या भागाच सुपरस्टार देव आनंद यांचा उल्लेख करत आणखी एक किस्सा सांगितला. नीना लिहितात, 'बर्‍याच वर्षांनंतर देव आनंद साहेबांनी मला त्यांच्या चित्रपटातील भूमिकेसाठी बोलावले. विशेष म्हणजे देव आनंद साहेबांनीही मला त्याच हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे गेल्यावर कळलं की सन अँड सँड हॉटेलमधला त्याचा एक स्‍यूट वर्षभर फक्त बुक होतो. या हॉटेलमध्ये पोहोचताच मला भूतकाळातील सर्व काही आठवले. मी स्वतःला म्हणालो, 'माझे कोणीही नुकसान करू शकत नाही, मी जाणार आणि त्यांना भेटणार.' मी वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा वाजवले. देव साहेबांनी दरवाजा उघडला. त्यांनी माझं स्वागत केलं. मला चहा-कॉफी विचारली, माझ्याशी अतिशय आदराने बोलले आणि भूमिका सांगितली. ती खूप छोटी भूमिका होती. मी तिथेच म्हणाले, 'सर मला तुमच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे, पण मला यापेक्षा चांगली भूमिका हवी आहे.' मग ते म्हणाले, 'काही हरकत नाही.' मी विचारले, तुम्हाला रागवलात तर नाहीत ना,' ते म्हणाले, मी का रागावू? तुम्हाला ते करायचे की नाही हा तुमचा निर्णय आहे. त्यानंतर काही वेळ गप्पा मारून मी त्यांचा निरोप घेतला.”


 

Web Title: Actress Neena Gupta made a sensational revelation about the casting couch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.