पहिल्याच चित्रपटातून हिट झाली होती अजय देवगणची ही हिरोईन, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 11:22 IST2020-03-26T11:21:12+5:302020-03-26T11:22:34+5:30

अजय देवगणची ही अभिनेत्री आताही दिसते तितकीच ग्लॅमरस

Actress Madhu's Unseen Pictures tjl | पहिल्याच चित्रपटातून हिट झाली होती अजय देवगणची ही हिरोईन, आता दिसते अशी

पहिल्याच चित्रपटातून हिट झाली होती अजय देवगणची ही हिरोईन, आता दिसते अशी

बॉलिवूडमध्ये असे कित्येक कलाकार आहेत ज्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला पण त्यानंतर ते गायबच झाले. अशीच एक अभिनेत्री आहे जिचं नाव आहे मधु. चित्रपट फूल और कांटे आणि रोजा चित्रपटातून अभिनेत्री मधूने त्या काळात खूप लोकप्रियता मिळवली होती. मात्र लवकरच ती बॉलिवूडमधून गायब झाली आहे. 26 मार्चला मधु 51वा वाढदिवस साजरा करत आहे.  

फार कमी लोकांना माहित आहे की अभिनेत्री मधूचं पूर्ण नाव आहे मधुबाला रघुनाथ. तिने फक्त हिंदी चित्रपटातच काम केलं नसून तमीळ, तेलगू व कन्नड चित्रपटात काम केले आहे. मधूचे पहिल्यापासून बॉलिवूडसोबत नाते आहे. ती हेमा मालिनींची पुतणी व जुही चावलाची भाभी आहे. तिला कित्येक वेळा हेमा मालिनी यांच्या घराबाहेर दिसली आहे.

मधुने चित्रपट फूल और कांटेमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. मधुने हिंदीत फार मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. मात्र तिने मल्याळम व तमीळ अशा जवळपास 50 चित्रपटात आपले अभिनय कौशल्ये दाखवले आहे.

1999 साली मधुने आनंद शाह यांच्यासोबत लग्न केले. ते बिझनेसमन आहेत. लग्नानंतर मधू सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली. मात्र त्यानंतर तिने काही सिनेमात काम केले. ज्यात कभी सोचा ना था, टेल मी ओ खुदा व लव यू मिस्टर कलाकार या चित्रपटांचा समावेश आहे.

एका मुलाखतीत मधूने सांगितले होते की, लव यू मिस्टर कलाकारच्या आधी मी ब्रेक घेतला होता. कारण माझी मुले लहान होती आणि मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे होते. त्या चित्रपटानंतर मला अशा होती की मी सातत्याने काम करेन पण असे काही बरेच वर्षे झाले नाही.

मधुला दोन मुली आहेत. अमेया व किया अशी त्यांची नावं आहेत.

2017 साली मधूने छोट्या पडद्यावर 8 वर्षांनी कमबॅक केले होते. तिने आरंभ या मालिकेत काम केले होते. 

Web Title: Actress Madhu's Unseen Pictures tjl