फोटोतील ही चिमुकली आहे सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भाची,आज बॉलिवूडमध्ये बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:34 AM2023-11-09T09:34:16+5:302023-11-09T09:57:35+5:30

ऐश्वर्या, संगिता, कतरिना नाही तर सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंड नाव माहितीये का? ही चिमुकली आहे तिची भाची

Actress Kiara Advani is niece of salman khan s first girlfriend shaheen Bano | फोटोतील ही चिमुकली आहे सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भाची,आज बॉलिवूडमध्ये बोलबाला

फोटोतील ही चिमुकली आहे सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडची भाची,आज बॉलिवूडमध्ये बोलबाला

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं काय कनेक्शन लागेल सांगता येत नाही. आता फोटोतील ही चिमुकली बघा. आज या मुलीचा बॉलिवूडमध्ये बोलबाला आहे. तिच्याकडे सिनेमांच्या ऑफर्सची रांग आहे. पदार्पणात फ्लॉप ठरलेली ही अभिनेत्री आता आघाडीवर आहे. पण या अभिनेत्रीचं आणखी एक कनेक्शन म्हणजे ती सलमान खानच्या (Salman Khan) पहिल्या गर्लफ्रेंडची भाची आहे. ऐकून चकित झाला असाल ना?

दबंग अभिनेता सलमान खानचे अनेक अफेअर्स राहिले आहेत. त्याची आणि ऐश्वर्याची जोडी तर सुपरहिट होती. नंतर अभिनेत्याचं लग्न अभिनेत्री संगिता बिजलानी सोबत ठरलं होतं. दोघांचा साखपुडाही झाला मात्र नंतर हेही नातं तुटलं. याहीनंत सलमान खानच्या आयुष्यात सोमी अली, कतरिना कैफ आल्या. त्यांच्यासोबतही सलमानचं अफेअर चर्चेत होतं. मात्र सलमानची पहिली गर्लफ्रेंड होती शाहीन बानो (Shaheen Bano). अभिनेत्री शाहीन बानो आणि सलमान खान इतके क्लोज होते की दोघंही 'मैने प्यार किया' च्या ऑडिशनला सोबत गेले होते. मात्र तेव्हा शाहीनची निवड झाली नाही आणि भाग्यश्रीला चित्रपट मिळाला. शाहीन बानो तेव्हा शाहीन जाफरी होती. सलमान खान कॉलेजमध्ये असताना त्या दोघांच्या अफेअरची चर्चा होती.

तर फोटोतील ही चिमुकली शाहीन बानोचीच भाची आहे ती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani). कियाराची आई जेनेवीव अडवाणी या शाहीन बानो यांच्या चुलत बहीण आहेत. त्यांनीच सलमान आणि शाहीनची ओळख करुन दिली होती. तेव्हा दोघांच्या भेटी होऊ लागल्या आणि काही काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. 

अभिनेत्री कियाराने एका मुलाखतीत याचा खुलासा करताना सांगितलं होतं की, 'माझी आई आणि सलमान खान हे एकत्रच बांद्रा येथे लहानाचे मोठे झाले आहेत. आईनेच सलमानची शाहीन मावशीशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत होते.'

कियारा अडवाणी आणि अभिनेत्री जूही चावलाचंही कनेक्शन आहे. कियाराचे वडील जगदीप अडवाणी आणि जूही चावला यांची लहानपणापासून मैत्री आहे. हे देखील कियारा दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. कियारा 2014 मध्ये 'फगली' या सिनेमातून पदार्पण केलं. मात्र हा सिनेमा फारसा चालला नाही. नंतर ती 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी','लस्ट स्टोरीज','शेरशाह' या सिनेमांमध्ये दिसली.

Web Title: Actress Kiara Advani is niece of salman khan s first girlfriend shaheen Bano

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.