क्रिती सॅनॉनची जागा घेतली या मराठमोळ्या अभिनेत्रीने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:29 IST2016-12-12T17:29:26+5:302016-12-12T17:29:26+5:30
लखनऊ सेंट्रल या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नाही. या चित्रपटात ...

क्रिती सॅनॉनची जागा घेतली या मराठमोळ्या अभिनेत्रीने
ल नऊ सेंट्रल या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नाही. या चित्रपटात फरहान अख्तर, क्रिती सॅनॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा सतत बदलत आहेत. यामुळे आता क्रितीने हा चित्रपट सोडण्याचे ठरवले आहे. क्रितीने तिच्या आगामी तारखा दुसऱ्या चित्रपटांना दिल्यामुळे तिच्याकडे आता चित्रपट सोडण्याशिवाय पर्यायच नाहीये. क्रितीने चित्रपट करण्यास नकार दिल्याने याचा फायदा अभिनेत्री सैयामी खेरला झाला आहे. कारण क्रितीची जागा आता सैयामी घेणार आहे.
विशेष म्हणजे सैयामीची या चित्रपटामुळे कित्येक दिवसांपासूनची एक इच्छा पूर्ण झाली आहे. फरहान अख्तरसोबत काम करण्याची ती आतुरतेने वाट पाहात होती. त्यामुळे या चित्रपटाची ऑफर आल्यावर क्षणातच तिने या चित्रपटात काम करण्याचे ठरवले. हा चित्रपट साईन केल्यापासून तिचा आनंद गगनात मावत नाहीये. सैयामीने मिर्झिया या तिच्या पहिल्या चित्रपटात राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी ती राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्याकडून भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी फरहानने किती मेहनत घेतली याचे किस्से ऐकत असे. तेव्हापासूनच फरहानसोबत एका तरी चित्रपटात काम करायला मिळावे असे तिला वाटत होते. आज इतक्या लवकर तिची ही इच्छा पूर्ण झाल्याने ती या चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहात आहे. पुढील महिन्यातच ती फरहानसोबत चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.
![saiyami kher replace kriti sanon in lucknow central]()