दिशा पटानीचा हा वर्कआऊट व्हिडीओ पाहून फुटेल तुम्हाला घाम, सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 14:44 IST2021-01-14T14:29:23+5:302021-01-14T14:44:44+5:30
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

दिशा पटानीचा हा वर्कआऊट व्हिडीओ पाहून फुटेल तुम्हाला घाम, सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. दिशा तिच्या हॉट स्टाईलसाठीही ओळखली जाते, इन्स्टाग्रामवर बर्याचदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. असा एक व्हिडिओ दिशाने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसते आहे. दिशा या व्हिडीओत पुलडाऊन एक्सरसाइज करताना दिसते. इंटरनेटवर हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतो आहे. फॅन्ससोबत बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही यावर कमेंट केल्या आहेत.
दिशा बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा आपल्या फिटनेसला घेऊन खूपच अर्लट असते. ती नेहमीच जीममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.यासोबतच, दिशा लवकरच 'एक विलेन 2' मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन 'मलंग'चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.